esakal | भावाने नाही म्हटल्यावरही बहीण बसली प्रियकराच्या दुचाकीवर; अन् केला खून
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

भावाने नाही म्हटल्यावरही बहीण बसली प्रियकराच्या दुचाकीवर; अन्

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : एका १६ वर्षीय विधी संघर्षग्रस्त भावाने बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराचा कैचीने भोसकून खून केला. ही घटना ५ ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जरीपटका पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे. मलकियसिंग जसबीरसिंग वर्मा (२०, रा. बाबा दीपसिंगनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

मलकियसिंग हा मूळचा पंजाबचा असून, त्याला तीन बहिणी आणि आई आहे. बहिणींचे लग्न झाल्यानंतर तो जरीपटक्यात आईसोबत राहतो. त्याचे वस्तीत राहणाऱ्या रिया (बदललेले नाव) हिच्याशी प्रेमप्रकरण होते. रियाला लहान भाऊ आणि आई आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती रियाच्या आईला झाली. त्यानंतर रियाने मलकियसिंगची ओळख आई व भावाशी करून दिली. तेव्हापासून तो रियाच्या घरी ये-जा करायला लागला.

हेही वाचा: सुंदर तरुणी दिवसा करतात स्टाफच काम, रात्री करतात देहव्यापार

रिया आणि मलकियसिंग यांच्या प्रेमाची चर्चा परिसरात होती. त्यामुळे रियाचा भाऊ नेहमी तिच्यावर चिडत होता. रिया फार्मसीत नोकरीवर लागली. तिचे आणि मलकियसिंगचे प्रेमसंबंध वाढले. त्यामुळे मलकियसिंग हा तिला रोज फार्मसीत पोहोचवून देत होता आणि घरी आणत होता. मलकियतसिंगचे रियाच्या घरी ये-जा होती.

५ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास मलकियतसिंग हा प्रेयसीच्या घरी आला आणि प्रेयसीला बाहेर फिरायला नेऊ लागला. दोघेही बाहेर जाण्याच्या तयारीत असताना भावाने बहिणीला बाहेर जाण्यास मनाई केली. त्यावरून मुलगा आणि मलकियतसिंग यांच्यात वाद झाला. ‘तेरी बहन रात में मेरे साथ के लिए तयार हैं, तो तुझे क्या प्रॉब्लेम हैं?’ असा प्रश्‍न केला. त्याने आईला विचारून बहिणीला घेऊन जा, अशी अट टाकली. त्यामुळे दोघांत पुन्हा वाद झाला.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

तोपर्यंत रिया ही मलकियसिंग याच्या दुचाकीवर बसली आणि निघून जाण्याच्या तयारीत होती. दरम्यान मुलाने घरात ठेवलेली कैची आणली आणि मलकियतसिंगच्या पोटात आणि छातीत खुपसली. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले.

loading image
go to top