

Sleep Tourism
sakal
नागपूर : आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत झोप ही चैनीचा भाग झाली आहे. कामाचा ताण, मोबाईल आणि स्क्रीनचा वाढता वापर, अस्थिर दिनक्रम व मानसिक ताण यामुळे अनेकांना चांगली झोप येत नाही. परिणामी थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव तसेच आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता जगभरात एक नवा स्लीप टुरिझमचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे.