छोटे उद्योग अडचणीत | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : छोटे उद्योग अडचणीत

नागपूर : छोटे उद्योग अडचणीत

नागपूर : लिलाव बंद असल्याने कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने किमतीतही वाढ झालेली आहे. त्यामुळे छोट्या उद्योगांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. काही उद्योग बंद पडल्याचीही माहिती समोर येत आहे. जागतिक बाजारात कोळशाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे काही कंपन्या आयात करीत आहे. आयात स्वस्त असल्याने मोठमोठ्या कंपन्या विदेशी मार्केटमध्ये जात आहे, परंतु छोट्या उद्योगांचे संकट अजूनही टळले नाही. सामान्य स्तरावर चांगला कोळसा चार हजार ते पाच हजार रुपये टन असतो. तो आता ८,२०० ते ८,५०० रुपयांवर गेला आहे. छोट्या उद्योगांसाठी ही स्थिती आव्हानात्मक आहे.

कोल इंडिया लिमिटेडच्या आदेशानंतरही ऑक्टोबर महिन्यात वेकोलिकडून कोळशाचा लिलाव झालेला नाही. लिलाव बंद असल्यानेच किमतीत वाढ झालेली आहे. बाजारात कोळशाचा तुटवडा आहे. वेकोलिकडून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोळशाचा लिलाव करण्यात आला होता, परंतु हा लिलाव कोट्यानुसार झालेला नव्हता. लिलावामध्ये कोट्यापेक्षा अत्यंत कमी कोळसा ठेवण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे.

हेही वाचा: निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीसांना पाठवली नोटीस

पाच ऑगस्टला १.८३ लाख टन, १९ ऑगस्टला १.२० लाख टन, सप्टेंबरमध्ये १.३६ लाख टन आणि २.८२ लाख टन कोळशाचा लिलाव झाला होता. ऑक्टोबरमध्ये पूर्णपणे बंद आहे. महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडून दोन वर्षांपासून उद्योगांकरिता कोळशाची खरेदी केल्या जात नाही. परिणामी उद्योगांना खुल्या बाजारातून कोळसा खरेदी करावी लागत आहे. उद्योगांचे कोट्यवधी रुपये महामंडळाकडे अडकून पडले आहे.

मागणी वाढली बाजारामध्ये औद्योगिक उत्पादनांची चांगली मागणी असल्याने कारखान्यांमध्ये उत्पादनही वाढविण्यात आले आहे. मात्र कोळशाच्या तुटवड्यामुळे उद्योजक मागणीच्या तुलनेत उत्पादन करू शकत नाही. कोळशाचा पुरवठा झाला असता तर उत्पादनही वाढविता आले असते. उत्पादन वाढवणे कठीण असताना मात्र, उत्पादन खर्च वाढलेला आहे.

वेकोलिकडून अजूनही वीज उत्पादकांना भरपूर कोळशाचा पुरवठा केला जात आहे. दररोज २७ ते ३० रॅक कोळसा वीज उत्पादन कंपन्यांना दिला जात आहे. यामुळेच उद्योग संकटात येत आहे. सीआयएलचे धोरण आता उद्योगांकरिता घातक ठरत आहे. असेच सुरू राहिल्यास अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.

-प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

loading image
go to top