esakal | ऑनलाईन छेडखानी रोखण्यासाठी कठोर कायदे करा! अजित पारसे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन छेडखानी रोखण्यासाठी कठोर कायदे करा

इंटरनेटच्या जगात ऑनलाईन होणारी छेडखानी मुली किंवा महिलांच्या मानसिक आरोग्यावर आघात करु शकते किंवा सामाजिक जीवनात त्यांना बदनाम करु शकते.

ऑनलाईन छेडखानी रोखण्यासाठी कठोर कायदे करा

sakal_logo
By
- राजेश प्रायकर

नागपूर: सोशल मिडियावरही (Social media) आता सायबरबुलिंग अर्थात ऑनलाईन (online harassment) छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मिडियावर वावर असलेल्या महिलांचा वाढता मनस्ताप बघता ऑनलाईन छेडखानीविरुद्ध कठोर कायदे करा, असे पत्र सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे (Ajit parase) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांना पाठविले.

हेही वाचा: सुपर स्पेशालिटीमध्ये किडनीग्रस्तांना प्रत्यारोपणाची प्रतीक्षा

अभिनेत्री हेगांमी कवीने अंतर्वस्त्राबाबत आपली मते सोशल मिडियावर मांडली अन् सायबरबुलिंग, सोशल मिडियावरील छेडखानीचा मुद्दा ऐरणीवर आला. हेमांगी कवीने चपात्या करतानाच एक रिल सोशल मिडियावर अपलोड केले. यावर अनेक नकारात्मक कमेंट आल्या. या सायबरबुलिंग प्रकारात मोडतात. हेमांगीसारख्या अनेक मुली व महिलांना रोज सोशल मिडियावर ऑनलाईन छेडखानीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटच्या जगात ऑनलाईन होणारी छेडखानी मुली किंवा महिलांच्या मानसिक आरोग्यावर आघात करु शकते किंवा सामाजिक जीवनात त्यांना बदनाम करु शकते. याला आवर घालण्यासाठी सायबरबुलिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारे कठोर कायदे करण्याची गरज सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून कायदे करण्याची मागणी केली.

हेही वाचा: सार्शी गाव जगावेगळे! गाईंना विश्रांतीसाठी ठेवल्या जातात चक्क गाद्या

सोशल माध्यमावर अश्लिल कमेंट्स किंवा चॅटिंग करणे, कुणाची फेक आयडी तयार करुन बदनामी करणे, नको त्या बाबी टॅग करणे, ब्लॅकमेलिंग करणे. मुली किंवा महिलांसोबत घडणारे असे सर्व प्रकार ऑनलाईन छेडखानीत मोडतात. सोशल माध्यमात वावरताना याचा सर्वाधिक सामना महिला आणि मुलींना करावा लागतो. देशात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यंदा तो आकडा ४४ कोटींवर गेला असून महिलांची संख्याही मोठी आहे, असे पारसे यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा: नागपूरमध्ये नेट, मोबाईल नसलेल्या गरीब मुलांसाठी ऑफलाईन शाळा

ऑनलाईन छेडखाणी रोखण्यासाठी प्रभावी कायदे नाहीत. त्यामुळे एखाद्या मुलीसोबत सायबरबुलिंगचा प्रकार घडला तर गुन्हेगाराला पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवता येतील, अशा कठोर कायद्याची काळानुरूप गरज आहे.

- अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

loading image