ST news: एसटीचा पैसा खासगी तिजोरीत! ;महामंडळाला कोट्यवधींचे नुकसान ;प्रवाशांच्या रिचार्जवरील रक्कमही कपात

ST NCMC Card, E-Bix, Recharge Deduction — एसटीच्या एनसीएमसी कार्डवरील रिचार्जची रक्कम खासगी कंपनीच्या खात्यात जमा होत असल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केला आहे. रिचार्जवरील शुल्क आणि निधी एसटीच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीचा मुद्दा चर्चेत आहे.
ST News
ST News esakal
Updated on: 

नागपूर: राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या ‘एनसीएमसी’ कार्डमधील कोट्यवधी रुपये महामंडळाऐवजी खासगी कंपनीच्या तिजोरीत जमा होत आहेत. यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होत असून प्रवाशांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. ही रक्कम महामंडळाच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेना आक्रमक झाली आहे. राज्यात सुमारे ६ कोटी सवलतधारक प्रवासी असून आतापर्यंत १ कोटी २० लाख प्रवाशांनी नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड (एनसीएमसी) कार्ड घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com