औद्योगिक भूखंडांवर प्रचलित दरानेच हवी स्टॅम्प ड्यूटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

नागपूर : औद्योगिक भूखंडांवर प्रचलित दरानेच हवी स्टॅम्प ड्यूटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रचलित भूखंड दरांनाच आधार बनवून स्टॅम्प ड्यूटी वसूल करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नुकतेच बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना दिले. याबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यात नमुद केले आहे.

बीए‌मएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम‌आयडीसी) एक स्पेशल पर्पज ॲथॉरिटी आहे. दरवर्षी एम‌आयडीसीतील भूखंडांच्या भाड़ेपट्टीपचा दर तेच निर्धारित करीत आहे. हे दर त्या क्षेत्रातील दर लक्षात घेऊन जानेवारीमध्ये निश्चित केल्या जाते.

एम‌आयडीसीच्या भूखंडांचे भाडेपट्टी दर शासकीय मानबिंदू प्रमाणाच्या आधारावर निश्चित केल्या जाते. परंतु, एम‌आयडीसी क्षेत्राच्या बाहेरील जमिनीवर कोणतीही स्पेशल पर्पज ॲथॉरिटी नसल्याने मुद्रांक शुल्क, कॅपिटल गेन टॅक्स, बँक मूल्यांकन आदींचे आकलन राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून केल्या जाते आणि रेटचे निर्धारण रेडीरेकनर दराच्या आधारे करून मुद्रांक शुल्क, कॅपिटल गेन टॅक्स आदी लावले जाते.

हेही वाचा: सिन्नर : पळून जाणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडले

यामुळेच खंडेलवाल यांनी मागणी केली की, एम‌आयडीसी‌ एक स्पेशल पर्पज ॲथॉरिटी असल्याने एम‌आयडीसी क्षेत्रातील भूखंडांवर राज्य सरकारच्या अन्य कोणत्याही विभागाकडून टॅक्स लावल्या जाऊ शकत नाही. मुद्रांक शुल्क, कॅपिटल गेन टॅक्स आदी एम‌आयडीसी क्षेत्राच्या प्रचलित दरानुसारच निर्धारित करायला हवे. रेडीरेकनर रेट एम‌आयडीसी रेटच्या तुलनेत अत्यंत जास्त आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क आणि कॅपिटल गेन टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे जे उद्योग बंद झाले आहेत, त्यांना दुसऱ्या व्यक्तीला विकायचे असल्यास किंवा हस्तांतरित करायचे असल्याच त्या कारखान्याच्या जमिनीचे मूल्यांकन रेडीरेकनरनुसार नव्हे तर एम‌आयडी‌सी रेटच्या आधारावर असायला हवे. यामुळेच उद्योग लावण्यात कोणीच पुढाकार घेत नाही. परिणामी रोजगार निर्मितीही होत नाही आणि वीज व अन्य करांच्या माध्यमातून येणारी आवकही थांबते आणि औद्योगिक विकास मंदावते.

loading image
go to top