esakal | वरचढ होण्याचा प्रयत्न करू नका; काँग्रेस आहे म्हणूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता शाबूत
sakal

बोलून बातमी शोधा

State President Nana Patole said that the power of the Grand Alliance is intact only because of the Congress

कोरोनाकळात वीज माफीची मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. ती जनतेची मागणी आहे. त्यावर काँग्रेस ठाम आहे. आम्ही जनतेसोबत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या समन्वय बैठकी ही मागणी रेटून लावली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वरचढ होण्याचा प्रयत्न करू नका; काँग्रेस आहे म्हणूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता शाबूत

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : काँग्रेस आहे म्हणूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता शाबूत आहे. त्यामुळे कोणीही वरचढ होण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगून काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याच मित्रपक्षांना इशारा दिला. यावेळी त्यांनी आम्ही जनतेसोबत आहोत सत्तेसोबत नाही हेसुद्धा स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पटोले प्रथमच नागपूरमध्ये आले होते. पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाआघाडीची सत्ता स्थापन करताना समान कार्यक्रमाची आखणी केली असल्याचे सांगितले. त्यामुळे आघाडीत कोणाचे मंत्री वरचढ याचा प्रश्न उद्‍भवत नाही. आम्ही आहोत म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. ते आहेत म्हणून काँग्रेसचा महसूलमंत्री आहे. त्यामुळे कोणाशी पंगा घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असेही पटोले म्हणाले.

अधिक वाचा - टिनाच्या शेडात पाच मुली, माय आणि आजी, चार महिन्यांपासून नाही अंघोळ

कोरोनाकळात वीज माफीची मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. ती जनतेची मागणी आहे. त्यावर काँग्रेस ठाम आहे. आम्ही जनतेसोबत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या समन्वय बैठकी ही मागणी रेटून लावली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विकास ठाकरे, राजेंद्र मुळक अभिजित वंजारी, अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मीडिया स्मार्टनेस नाही

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. काँग्रेसच्या ध्येयधोरणानुसार त्यांनाही जबाबदाऱ्या वाटून दिल्या जाईल. काँग्रेसचे मंत्री चांगले काम करीत आहेत. मात्र, त्यांच्यात मीडिया स्मार्टनेसचा अभाव असल्याचे पटोले यांनी विनोदाने सांगितले.

नंबर वनला वेळ लागणार नाही

महाराष्ट्रातील जनतेने फडणवीस सरकारचा कारभार बघितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. त्यांच्यावर शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिक नाराज आहे. काँग्रेस पक्ष नंबर वन व्हायला जास्त वाट बघावी लागणार नाही अशाही विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. 

जाणून घ्या - अमरावतीत कोरोना रुग्णांचा विस्फोट; प्रशासनाच्या पायाखालची सरकली जमीन

मोदी नटसम्राट

नरेंद्र मोदी मोठे नटसम्राट आहेत. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्या निरोप समारंभाच्यावेळी त्यांनी गाळलेले अश्रू अभिनयाचा उत्कृष्ट नमुना होता. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासाठी त्यांनी असेच अश्रू गाळले असते तर बरे झाले असते असा टोलाही पटोले यांनी लगावला.

loading image