esakal | नागपूरकरांनो शनिवार आणि रविवार घरीच राहा! महापौर आणि आयुक्तांचं आवाहन 

बोलून बातमी शोधा

corona virus

महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन केले. महापौर दयाशंकर तिवारी यांनी एका कोरोनाबाधीतामुळे गर्दीतील २५ व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली.

नागपूरकरांनो शनिवार आणि रविवार घरीच राहा! महापौर आणि आयुक्तांचं आवाहन 
sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवारी घरीच राहावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. दोन दिवस प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. 

महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन केले. महापौर दयाशंकर तिवारी यांनी एका कोरोनाबाधीतामुळे गर्दीतील २५ व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली. इतरांचे आरोग्य धोक्यात टाकणे योग्य नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग हे नियम पाळावेच आणि वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. 

'भ्रष्टाचार हा तर सिस्टमचा भाग'; राज्याच्या पोलिस महासंचालकांचं धक्कादायक...

महापालिका करीत असलेली कारवाई लोकांच्या आरोग्यासाठी असल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले. शनिवार आणि रविवारी कुणीही घराबाहेर निघू नये. अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दुकाने, मॉल, बाजार, थिएटर, नाट्यगृह, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरेंट, सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये, मनपाचे कत्तलखाने, शहरातील मांस विक्रीची दुकाने सुरू राहणार नाही. 

नागरिकांनीही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. कुटुंबासोबत दिवस घालवावा आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

सावधान! जंगलात 'हाय अलर्ट' घोषित; अधिकारी...

१८ मंगल कार्यालयांवर दोन लाखांचा दंड 

महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी१८ मंगल कार्यालय, लॉनवर कारवाई केली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, गर्दी केल्याप्रकरणी या मंगल कार्यालयांकडून २ लाख १ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पथकाने आज १०६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

संपादन - अथर्व महांकाळ