BSc Nursing Colleges
sakal
-केवल जीवनतारे
नागपूर: राज्यात पाच शासकीय बीएससी नर्सिंग कॉलेज २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांची प्रतिवर्ष प्रवेश क्षमता प्रत्येकी ५० आहे. मात्र, नव्याने घोषित सात कॉलेजेसमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असूनही प्रती कॉलेज शंभर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता देण्यात आली आहे. त्याही पेक्षा आश्चर्यकारक बाब म्हणजे या सर्व बाराही कॉलेजेसमध्ये प्राचार्य, उपप्राचार्यांची आर्थिक लाभाशिवाय जणू सक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे.