esakal | Video : हे सरकार पडेल आणि चार महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल
sakal

बोलून बातमी शोधा

sudhir mungantiwar said This government will fall and BJP will come to power in four months

भाजपचे मिशन महाराष्ट्र सुरू झाले आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. शुभकार्य कधी ना कधी होणार आहे. हे सरकार तीन ते चार महिन्यात पडेल. चार महिन्यानंतर भाजप सत्तेत येईल, असे ते म्हणाले.

Video : हे सरकार पडेल आणि चार महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत आम्हाला होते. महाविकासआघाडी बेईमानी सत्तेत आली. याचा त्यांना घमंड झाला आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अन्यायकारक सरकार टिकवणे हे सुद्धा आमच्या हातून सर्वांत मोठी घोडचूक होईल. हे सरकार पडेल आणि चार महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारीच संपले. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वाद झाले. एकमेकांवर आरोप, जुने विषय काढण्यापासून चौकशी लावण्याची मागणी करेपर्यंत वाद झाला. सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.

जाणून घ्या - आता WhatsAppचे काही वर्षांआधी पाठवलेले मेसेजही करा डिलीट; या स्टेप्स नक्की करा फॉलो

मनसुख हिरेण यांच्या खूनप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख आणि फडणवीस यांच्यात चांगलीच चर्चा रंगली. यामुळे फडणवीसांनी माझीही चौकशी करा, पण आधी गुन्हेगारांची चौकशी करण्याची मागणी रेटून धरली होती.

या सर्वांबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील भाष्य केले. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. भाजपचे मिशन महाराष्ट्र सुरू झाले आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. शुभकार्य कधी ना कधी होणार आहे. हे सरकार तीन ते चार महिन्यात पडेल. चार महिन्यानंतर भाजप सत्तेत येईल, असे ते म्हणाले.

‘कोशीश करणे वाले की हार नही होती’

बहुमत आम्हाला होते. मात्र, हे सरकार बेईमानीने सत्तेत आले. अन्यायकारक सरकार टिकवणे हे सुद्धा आमच्या हातून सर्वांत मोठी घोडचूक होईल. जनहित विरोधी सरकारविरोधात शक्तीने लढावेच लागेल. ‘जो होता वह...’ हे आता सांगण्याचे कारण नाही. अन्याय वाढतो तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. वीज बिल, शेतकऱ्यांवर अधिवेशनात चर्चाच झाली नाही. भाजप लवकरच सत्तेत येईल. ‘कोशीश करणे वाले की हार नही होती’, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

जाणून घ्या - मृत वाघाचा ‘बेपत्ता’ झालेला पाय सापडला; दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

मोहन भागवत भेटीत राजकीय चर्चा नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी संघ मुख्यालय गाठले. सरसंघ चालकांची घेतली भेट. विमानतळावरून थेट मुख्यालयात दाखल होत सरसंघ चालकांची घेतली भेट घेतली. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याची माहिती आहे. जवळपास २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

loading image