

BJP Defeat In Chandrapur Mungantiwar Blames Party Policy
Esakal
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. या पराभवानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट नाराजी व्यक्त केलीय. पक्षानेच माझी शक्ती कमी केली असं विधान मुनगंटीवार यांनी केलंय. काँग्रेसने त्यांच्या नेत्याला बळ दिलं पण आपल्या पक्षानं माझीच ताकद हिरावून घेतली. पक्षानं गटबाजाली पोषक असं वातावरण तयार केल्याचा हा परिणाम असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.