Sugar Price : साखरेच्या भाववाढीचे चटकेही वाढणार ; सरकारचा कोटा वाढला तरी दराचा आलेख चढताच

ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उकाड्यामुळे शीतपेयांचा खप वाढला आहे. केंद्र सरकारने निवडणुका लक्षात घेता मे महिन्यात साखरेच्या कोट्यात भरघोस वाढ केलेली आहे.
Sugar Price
Sugar Pricesakal

नागपूर : ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उकाड्यामुळे शीतपेयांचा खप वाढला आहे. केंद्र सरकारने निवडणुका लक्षात घेता मे महिन्यात साखरेच्या कोट्यात भरघोस वाढ केलेली आहे.

सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवाढीस आळा बसावा म्हणूनच हा निर्णय घेतला. याला ''इलेक्शन कोटा'' असे संबोधले जात होते. त्याला मात्र चापर बसली असून साखरेचे भाव प्रतिकिलो एक रुपयांनी वाढले आहे. लवकरच साखरेच्या दरात सरासरी दोन रुपयांची वाढ होईल अशी चर्चा व्यापारीवर्गात आहे. तूरडाळ, तांदळाच्या दरवाढीनंतर आता साखरेचे भाव वाढू लागले आहे.

केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला साखरेचा कोटा जाहीर करीत असते. मे महिन्याचा २७ लाख टनाचा कोटा केंद्राकडून जाहीर केला. कोटा मुबलक असल्याने साखरेच्या दरात प्रतिकिलो एक ते दोन रुपयांची घसरण अपेक्षित होती. सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या त्या मनसुब्याला मात्र धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे मागील महिन्यात साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने प्रतिकिलो दोन ते अडीच रुपये भाव वाढले होते. त्यावर नियंत्रणासाठीच केंद्र सरकारने कोटा वाढीची युक्ती लढविली. सरकारचा तो डाव फसला आहे. सतत भाववाढ होऊ लागली आहे. त्यामागे साठेबाज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

Sugar Price
Sugar Rates : साखरेचा किमान दर वाढणार ; केंद्राने कारखान्यांकडून मागविली माहिती

केंद्र सरकारने मार्चसाठी २३.५० लाख टन, एप्रिलसाठी २५ लाख टन साखरेचा कोटा खुला केला होता. यंदा उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड आहे. शीतपेय उत्पादकांकडून साखरेच्या खरेदीचे प्रमाण वाढत असल्याचा विचार करून एप्रिल इतकाच म्हणजे २५ लाख टनाएवढाच कोट्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मात्र, लोकसभा निवडणुकीतील वारे लक्षात घेता केंद्र सरकारने तब्बल २७ लाख टन साखर खुली केली.

कोटा जाहीर होताच भाव कमी होण्याची शक्यता होती. मात्र, त्यात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोटा आणि मागणी लक्षात घेता साखरेच्या बाजारात साठेबाज सक्रिय झाल्याची चर्चा आहे. अजूनही प्रतिकिलो दोन रुपयाची वाढ अपेक्षित आहे अशी चर्चा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com