
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणातील पैशांच्या वसुलीसंदर्भातील चौकशीवर कॉंग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार यांना स्थगिती हवी आहे. निवडणूकीपूर्वी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने चौकशीवर अंतरीम स्थगिती देण्यास नकार दिला होता. तर, राज्य शासनाला यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आज झालेल्या सुनावणीत सरकार स्थापनेचे कारण देत शासनाने उत्तर न दिल्याने केदार यांना अद्याप शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.