Supriya Sule
sakal
नागपूर : ‘‘राज्य आर्थिक डबघाईस गेले आहे. यानंतरही सरकार निधीची उधळपट्टी करीत आहे. त्यावेळी गुन्हेगारी, बेरोजगारी व आत्महत्यांचा आकडा वाढत आहे. आरोग्य, शिक्षण व सामाजिक प्रश्न सोडविण्यात सरकारला रस नाही. नैतिकतेचा विसर पडलेल्या या सरकारने असंस्कृतपणाचा कळस गाठला आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.