नागपूरवर "स्वाइन फ्लूचे" संकट

शहरात आढळले बाधित : मेडिकलमध्ये वॉर्ड सज्ज
Nagpur
NagpurSakal

नागपूर : दरवर्षी हिवताप, डेंगी (Dengue), गॅस्ट्रो हे संसर्ग आजार डोके वर काढतात. मात्र कोरोनानंतर (Corona) डेंगीचा प्रकोप नागपूर जिल्हा अनुभवत असतानाच स्वाइन फ्लूचे (swine flu) नवे संकट उभे ठाकले आहे. नागपूर (Nagpur) जिल्हा आता स्वाइन फ्लूच्या सावटाखाली येत असल्याची भीती आहे. नुकतेच नागपूर विभागात सहा बाधित आढळले असून यातील चार जण नागपूर जिल्ह्यातील आहेत. मेडिकलमध्ये स्वाइन फ्लू वॉर्डासह नियंत्रण यंत्रणा सज्ज झाली आहे.

नागपुरात २००९ मध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला होता. यानंतर सातत्याने स्वाइन फ्लूचा प्रकोप उपराजधानीत होत आहे. मागील दोन वर्षांत कोरोना महामात स्वाइन फ्लूपासून तर डेंगीकडे आरोग्य यंत्रणेचे लक्षच गेले नाही. यामुळेच डेंगीने आता घात केला. नागपूर जिल्ह्यात सुमारे दोन हजार रुग्ण आढळून आले. आता स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. महिनाभरात नागपूर विभागात सहा रुग्ण आढळले आहेत. त्यात चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. शहरातील लॉ कॉलेज चौक, जरीपटका तर जिल्ह्यात रेल्वे कॉलनी (भिलगाव) परिसरातील प्रत्येकी एक रुग्ण असल्याची माहिती आहे. याशिवाय हिंगणघाटमधील एक तर भंडारा जिल्ह्यात दोन बाधित आढळले आहेत. दोन बाधित गंभीर असल्याची माहिती आहे. नागपूर विभागात सहा बाधित आढळल्याच्या वृत्ताला नागपूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

Nagpur
'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद; प्रेयसीला जबर मारहाण

राज्यात ९०० वर मृत्यू

राज्यात २०१५ मध्ये स्वाईन फ्लूचे ९०० वर मृत्यू झाले होते. तर सात हजारावर बाधित आढळले होते. सर्वाधिक मृत्यू पुणे विभागात झाले. त्यापाठोपाठ ठाणे, नागपूरचा क्रमांक होता. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार पुणे विभागात २७० जण स्वाइन फ्लूने दगावले आहेत. ठाणे विभागात १७६ तर नागपुरात १५१ जण दगावले आहेत. नाशिक विभागात ८५, कोल्हापूर विभागात ६३, औरंगाबाद विभागात ५९, अकोला विभागात ४२, अकोला विभागात ३४ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

नियंत्रण यंत्रणा सज्ज

स्वाइन फ्लू बाधितांसह संसर्ग रोगावरील प्रतिबंधासाठी मेडिकलमध्ये सुरुवातीला सहा कोटी रुपये खर्चून तीन माळ्यांचा संसर्गरोग वॉर्ड तयार करण्यात येणार होता. परंतु, अनुदानात कपात करण्यात आली. केवळ १ कोटी ९२ लाख रुपये मंजूर झाल्याने तळ मजला असलेलाच स्वाइन फ्लू वॉर्ड तयार झाला. २००९ मध्ये वॉर्ड मंजूर झाला. मात्र, सहा वर्ष लोटल्यानंतर तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेऊन हा वॉर्ड तयार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com