esakal | बँक खातेदाराचा कोरोनानं मृत्यू झाल्यास मिळणार तब्बल दोन लाख रुपये; घ्या पंतप्रधान विमा योजनाचा लाभ

बोलून बातमी शोधा

null
बँक खातेदाराचा कोरोनानं मृत्यू झाल्यास मिळणार तब्बल दोन लाख रुपये
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः पंतप्रधान विमा योजनेंतर्गत बँक खात्यातून ज्यांचे १२ रुपये दरवर्षी वजा झाले आहे अशा खातेदाराचा कोरोना किंवा अन्य कारणाने अकाली मृत्यू झाला असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये लाभ मिळतो. अनेकांना याची माहिती नसते. तसेच पैसे कापल्याची पावतीही मिळत नाही. त्यामुळे कुटुंबीयांना थेट बँकेच जाऊन याबाबत विचारणा करावी आणि लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा: दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डीची अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी

पंतप्रधान विमा योजनेंतर्गत लाभार्तीच्या बँक खात्यातून दरवर्षी १२ रुपये वजा केले जातात. ही योजना एक प्रकारे टर्म विमाचा आहे. यात लाभार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे. योजनेचे कुठलेही कागदपत्रे लाभार्थ्यांना दिली जात नाही. फक्त खाते पुस्तकात त्याची नोंद केली जाते. अनेक लाभार्थ्यांच्या कुटुंबास याची माहिती नसते.

हेही वाचा: 'दुपारपर्यंत आमच्याशी बोलला अचानक रात्री मुत्यू कसा?' नातेवाईकांचा डॉक्टरांविरोधात संताप

कोविडमुळे अनेकांचा अकाली मृत्यू झाला आहे. त्याच्या उपचारावरून बरेचसे पैसे खर्च झाले आहे. त्यामुळे गोरगरीब कोलमडून पडले आहे. त्यामुळे या योजनेतून लाभार्थ्याच्या कुटुंबीया दिलासा मिळू शकतो. माहिती नसल्याने मोजक्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या खाते पुस्तक अद्यावत करून नोंदी बघाव्या. कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यू झाला असल्याचे बँकेकडे विचारण करून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ