flu pneumococcal vaccin
flu pneumococcal vaccinsakal media

वातावरणाच्या मुकाबल्यासाठी घ्या फ्लू, निमोकोकल लस!

ऋतू आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम शरीरावर होतो

नागपूर - पावसाळा सुरू झाला की, सगळ्यात जास्त चिंता वाटते ती तब्येतीची हवेतील उकाड्यानंतर सामना होतो तो गारवा आणि ओलावाच्या. ऋतू आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम शरीरावर होतो. सोबत किटक आणि डासांचा त्रास आहेच! तसेच दूषित पाण्यापासून येणाऱ्या आजारांपासून शरीराला दूर ठेवण्याची कसरतही करावी लागले. त्यामुळे प्रत्येकाने सजग राहण्याबरोबरच फ्लू, निमोकोकल लस (flu pneumococcal vaccine) घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ओलाव्यामुळे होणारी डासांची पैदास आणि डास चावल्याने होणारे संसर्ग, आजार, पाण्यातून होणारे विविध प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित राहायचे असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट सुरू असताना पावसामुळे व्हायरल व बॅक्टेरियल प्रादुर्भाव दुपटीने होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांनी अधिक सजग राहावे, असा सल्ला डॉ. अशोक अरबट यांनी दिला.

उन्हाळा संपून पावसाळा लागताच वातावरणात बदल व्हायला लागतात. तापमानात घट होऊन आर्द्रता वाढते. हे वातावरण बॅक्टेरियासाठी पोषक ठरते. हे बॅक्टेरीया शरीरावर आक्रमण करतात. सर्दी,ताप,घशात खवखव, थंडी वाजून ताप येणे अशी लक्षणे सुरू होतात. डासांची संख्या वाढून मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया विकारांची साथ येऊ शकते. कॉलरा, टायफाईड, हिपॅटायटिसचा धोकाही वाढतो.

प्रदूषणाचा धोका

प्रदुषणयुक्त वातावरणामुळेही श्वसन, हृदयाचे विकार आणि फुफ्फुसाचे कर्करोग विकारांची जोखीम वाढली आहे. ज्येष्ठ नागरिकांना श्वसन तसेच अन्य विकार असलेल्या (कोमॉर्बिड) रुग्णांना सर्वाधिक धोका आहे. श्वसनविकारांसाठी पावसाळ्याचा काळ संवेदनशील असतो, असे डॉ. अरबट म्हणाले. अस्थमा, सीओपीडी, दीर्घकालीन कफ, फुफ्फुसाचा कर्करोग आदी रुग्णांना लवकर विषाणू व जिवाणूंचा प्रादुर्भाव होतो. अल्जायमर, पार्किंसनसारख्या वयोमानानुसार होणाऱ्या मेंदूविकार रुग्णांना वातावरण बदलाचा त्रास संभवतो. कोविड-१९ चा धोका आहे. प्रत्येकाने दरवर्षी फ्लूची लस तसेच ज्येष्ठांनी निमोकोकल लस घ्यावी.

विकार टाळण्यासाठी....

  • हात नियमित धुणे

  • मास्कचा वापर

  • गरम पाणी, मिठाच्या गुळण्या करणे

  • अशुद्ध पाणी टाळणे

  • स्वच्छता राखणे

  • बाहेरचे पदार्थ टाळणे

  • पावसात भिजणे टाळा

कोविड-१९ सोबतच आता जगायचे आहे. यामुळे श्वसनरोगांचा धोकाही कायम आहे. वातावरण बदलामुळे श्वसनविकारात वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे कोविड बूस्टरसह फ्ल्यू आणि निमोकोकल विकारांना प्रतिबंध घालणाऱ्या लसी टोचून घ्याव्यात. मास्क व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावेत.

- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com