

Nagpur Tank Tower
ESakal
नागपुरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमधील अवडा कंपनीत शुक्रवारी टँक टॉवर कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला. काही कामगार टॉवरखाली अडकल्याचे मानले जात आहे. अपघात झाला तेव्हा अवडा सोलर पॅनेल बनवत होते. या घटनेत ११ कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.