विदेशवारी करणारा पोहेवाला : तर्री-पोहे फेमस करणारे रूपम साखरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रूपम साखरे

तर्री-पोहे फेमस करणारे रूपम साखरे यांचे निधन

नागपूर : पहाटेचे पाच वाजले की गर्दी तेथे व्हायला सुरवात व्हायची. आलिशान गाडीत फिरणारे साहेबच काय रेल्वे फलाटावर ओझे वाहून नेणारे हमालही येथे थोडा विसावा घेत ते केवळ येथील खमंग पोहे (Tarri-pohe) खाण्यासाठी. कस्तुरचंद पार्क येथील रस्त्याच्या कडेला तर्रीबाज पोहेवाला (Tarri-pohe) नव्हे तर नागपुरातील खवय्यांच्या संस्कृतीचे संचित म्हणूनच ओळखले जाणारे रूपम साखरे (Roopam sakhare) यांचे सोमवारी ६५ व्या वर्षी निधन (passed away) झाले. त्यांच्या निधनाने कस्तुरचंद पार्क परिसरातील तर्रीबाज पोह्याची चव कायमची हरवली आहे. त्यांच्यावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा आहे.

मोहननगर येथील रहिवासी असलेले रूपम यांची परिस्थिती हलाखीची होती. शिक्षणही फारसे नव्हते. मात्र, पन्नास वर्षांपूर्वी किलोभर पोहे घेऊन कस्तुरचंद पार्क परिसरातील फुटपाथवर पोहे विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि याच फुटपाथवर साखरे यांना जगण्याचे अर्थशास्त्र सापडले. ‘केपी की पोहा टपरी’ अशी ओळख झाली.

हेही वाचा: ‘नरेंद्र मोदींनी आता राष्ट्रपती अन् योगींनी पंतप्रधान व्हावे’

व्यवसाय तेजीत आल्यानंतर १२ तासांमध्ये ९० किलोंपेक्षा अधिक पोहे तयार करून विकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांनी तयार केलेले पोहे ही नागपूरची ओळख बनली होती. आर्थिक संपन्नता आल्यानंतर दरवर्षी कुटुंबाला घेऊन नव्या देशात फिरायला जात. विदेशवारी करणारा पोहेवाला अशीही त्यांची नवी ओळख बनली होती.

दरवर्षी ते नियमानुसार प्राप्तिकरही भरत होते. श्रीमंत झाल्यानंतरही दुकानात आल्यानंतर मात्र खाकी कपडे परिधान हातात सराटा घेऊन कढईत पोहे तयार करीत होते. म्हणूनच पहाटे दुकान सुरू थाटण्यास सुरवात झाली की, खवय्यांची गर्दी होणे सुरू होत असे. काही वेळातच चारचाकी गाड्या येऊन उभ्या राहात होत्या. गरीब आणि श्रीमंत एकाच ठिकाणी उभे राहून मोठ्या आवडीने पोह्यावर (Tarri-pohe) ताव मारताना दिसत दिसायचे. साखरे यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कच्या (Kasturchand Park) सौंदर्यिकरणात त्यांची टपरी हटविण्यात आले होती.

हेही वाचा: MPSC Exam : परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

विदेशींच्या हाती ‘हाफ टमाटर’ प्‍लेट

रूपम साखरे (Roopam sakhare) यांनी बनवलेले पोहे खायला दूरदूरवरून लोक येत होते. त्यांच्या दुकानासमोर विदेशी व्यक्तीही प्लेट घेऊन आनंदाने पोह्यावर ताव मारत होते. ‘हाफ टमाटर’ पोहे ही त्यांची खासियत होती. यामुळे पोहे अधिक चविष्ट होत. जवळपास ४५ वर्षे कस्तुरचंद पार्क येथे पोहे विक्रीचा व्यवसाय त्यांनी केला. साखरे रोज सकाळी ‘होंडा सिटी’ कारमधून मधून भाजीपाला विकत घेण्यासाठी भाजी मंडईत जात होते. त्याच गाडीत पोह्याचे पोते आणत होते. दिवसभर प्रत्येक पंधरा ते वीस मिनिटांना त्यांना कढईभर पोहे तयार करावे लागत होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur News
loading image
go to top