Teddy Day : प्रेमाची मुलायम भावना जागविणारा ‘टेडी-डे’, आपल्या पार्टनरला कोणता टेडी द्याल ?

फेब्रुवारी महिना ‘व्हॅलेंटाइन’ अर्थात प्रेमाचा महिना मानला जातो. व्हॅलेंटाइन साजरा करण्यापूर्वी सलग सात दिवस व्हॅलेंटाइन वीक’ साजरा केला जातो.
Teddy Day celebration
Teddy Day celebrationSakal

Teddy Day 2023: - फेब्रुवारी महिना ‘व्हॅलेंटाइन’ अर्थात प्रेमाचा महिना मानला जातो. व्हॅलेंटाइन साजरा करण्यापूर्वी सलग सात दिवस व्हॅलेंटाइन वीक’ साजरा केला जातो.

‘व्हॅलेंटाइन’ आठवड्यातील चौथा दिवस ‘टेडी-डे’ म्हणून साजरा होतो. हा टेडी प्रमाच्या मुलायम भावना जागवितो. काळजीचे प्रतीक असलेला टेडी म्हणजे प्रेमगीत गाणारा अशी भावना प्रेमी युगलांमध्ये असते.

व्हॅलेंटाइन वीकधील टेडी दिवसाला खूप महत्त्व आहे. केवळ प्रियकर आणि प्रेयसीच नाही तर चिमुकल्यांपासून तर मित्रांनाही टेडी भेट दिला जातो. कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणी एकमेकांना टेडी बिअर गिफ्ट करून आपल्या भावना व्यक्त करतात.

नागपूरच्या बाजारातही लाल रंगाच्या टेडी बिअरची गर्दी वाढली आहे. एक टेडी बिअर ३०० ते ५ हजार रुपयापर्यंत विकले जात आहेत. कॅट, युनिकॉर्न आणि विविध रंगातील आकर्षक टेडी बिअर बाजारात आले आहेत.

टेडी बिअरची सुरवात

टेडी बिअरची सुरवात अमेरिकेतून झाली. अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष थेयोडेर रुझवेल्ट यांच्या कारकिर्दीत उद्भवलेला मिसिसिपी आणि लुझियानामधील सीमावाद थांबवण्यासाठी गेले असता त्यांना जंगलात एक घायाळ अस्वल झाडाला बांधलेले दिसले. त्याची दया आली.

अस्वलाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी गोळी घालून ठार करण्याचा आदेश दिला. ही बाब एका व्यंगचित्रकाराने रेखाटून एका नामांकित वर्तमान पत्रात प्रसिद्ध केले.

तेव्हापासून प्रभावित होऊन टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम त्यांनी या अस्वलाचे आकार असलेले एक खेळणे तयार केले. त्याचे नाव टेडी बिअर ठेवले. तसेच रुझवेल्ट यांच्या टोपण नावावरून त्याला ‘टेडी बिअर’ म्हटले जाते. आजही हा टेडी बिअर इंग्लंडच्या पीटरफिल्डमध्ये सुरक्षित ठेवला आहे.

कुठला टेडी द्याल

हातात हृदय असणारा टेडी मुलींना फार आवडतो. त्यामुळे शक्यतो या पद्धतीचा टेडी निवडावा. तुमचा पार्टनर जर पेट लव्हर असेल तर कॅटचा किंवा युनिकॉर्न टेडी गिफ्ट करावा.

लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या टेडीचे मुलांना जास्त आकर्षण असते. प्रदीर्घ काळ नाते जपण्यासाठी एकमेकांना जुळलेले दोन टेडी भेट द्या.

टेडी बिअरच्या रंगाचे महत्त्व

  • गुलाबी टेडी बिअर कौतुक व्यक्त करतो

  • लाल प्रेमाची उत्कटता दर्शवितो

  • निळा वचनबद्धता दर्शवितो

  • हिरवा प्रियकराशी असलेले गडद नाते विशद करतो

  • केशरी टेडी आनंद, आशा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे

  • पांढरा टेडी हृदयाची शुद्धता आणि शांतता दर्शवतो

  • पिवळा ब्रेकअप करण्याचे संकेत दर्शवतो

  • काळा टेडी समोरच्या व्यक्तीने तुमचा प्रस्ताव नाकारण्याचे प्रतीक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com