उघडं दार देवा आता... मागणी नसल्याने फुलांचा सुगंध शेतातच कोंडला

उघडं दार देवा आता... मागणी नसल्याने फुलांचा सुगंध शेतातच कोंडला

नागपूर : कोरोनाचा सलग दुसऱ्या वर्षी मोठा आर्थिक फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मंदिर अद्यापही बंद असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यंदातरी मंदिरं उघडण्याची परवानगी मिळेल या आशेवर शेतकरी होते. यामुळे अनेकांनी फुलांची लागवड केली. मात्र, मंदिरच न उघडल्याने फुलांना पाहिजे तशी मागणी नाही. यामुळे शेतशिवारात विविध प्रकारची, विविध रंगाची फुले तोडणीविना आहेत. त्यांचा सुगंध शेतशिवारातच कोंडलेला आहे. (Temple-Closed-Flowers-are-not-in-demand-Farmers-in-Tension-Flowers-news-nad86)

कळमेश्वरातील तेलगाव परिसरात भिंगारे कुटुंब फुलाची शेती करतात. शेतात नाना प्रकारच्या फुलांचे प्रकार लावतात. विविध कार्यक्रम, लग्नसोहळे यामध्ये फुलांना मोठी मागणी राहते. येथील उत्पादक शेतकरी गावात शहरात फुलांची विक्री करत असतात. मात्र, दोन वर्षांपासून फूल उत्पादक शेतकरी कोरोनामुळे हैराण झाले आहे. फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. तसेच मंदिरे देखील बंद आहेत.

उघडं दार देवा आता... मागणी नसल्याने फुलांचा सुगंध शेतातच कोंडला
गळा दाबून प्रेयसीचा खून; महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले

त्यातच यंदा मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उत्सव आदी कार्यक्रम होत नसल्यामुळे फुलांना मागणी नाही. परिणामी उत्पादक शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. फुलशेतीवर लावलेला खर्च काढणेदेखील कठीण झाले आहेत. शेतकऱ्यांची मंडीमध्ये आवक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे मंदिर, मशीद, दर्गा बंद आहेत. तसेच नेहमी होणारे धार्मिक कार्यक्रमांसह इतरही कार्यक्रमांवर बंदी असल्याने फुलांची मागणी नाही. परिणामी फुलांना भाव नाही. जो लागवडीसाठी शेतकऱ्यांना खर्च येत आहे. तोदेखील निघत नसल्याने शेतकरी संकटात आला आहे.

कोरोनामुळे मागच्या वर्षी प्रचंड नुकसान झाले. एक एक दिवस काढणे कठीण गेले होते. नव्यानेच कोरोना आल्याने अनेकांनी जेवण्याची सोय केली. त्यामुळे कसे तरी दिवस काढता आले. दुसऱ्या वर्षीही कोरोना कायम असल्याने मोठे नुकसान होत आहे. आता कुणीही मदत करायला पुढे येत नाही आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिर उघडल्याशिवाय फूल उत्पादकांना कोणीही वाचवू शकणार नाही.
- अब्दुल शाकीर, फूल विक्रेता
आम्ही मागणीनुसार फूल विकत घेत असतो. दिवस पाहून फुलांची मागणी वाढवली जाते. मंदिर बंद असल्याने फारसे ग्राहक येत नाही. काही विशेष असेल तरच ग्राहक आधी सांगून ठेवतात. अन्यथा फारसे ग्राहक विचारतही नाही. मंदिर बंद असल्याने फटका बसत आहे. मंदिर अघडल्याशिवाय फुलांना मागणी येणार नाही, असेच आता दिसून येत आहे.
- राहुल शाहू, फूल विक्रेता
उघडं दार देवा आता... मागणी नसल्याने फुलांचा सुगंध शेतातच कोंडला
बोरवेलच्या खटखटीने किटलेत कान! तरी सुटला नाही पाणीप्रश्न

फूल गतवर्षी यंदा

  • शेवंती १00 ते १२0 १00 ते १२0

  • झेंडू १00 ५0 ते ६0

  • गुलाब १00 ते १५0 ७0 ते ८0

  • कलर १00 ५0 ते ६0

(Temple-Closed-Flowers-are-not-in-demand-Farmers-in-Tension-Flowers-news-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com