esakal | प्रेमात वेडी झालेल्या राधाचे अपहरण करण्याची प्रियकराची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमात वेडी झालेल्या राधाचे अपहरण करण्याची प्रियकराची धमकी

प्रेमात वेडी झालेल्या राधाचे अपहरण करण्याची प्रियकराची धमकी

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : प्रेयसीचे अपहरण करून लग्न करण्याची धमकी देणाऱ्या प्रियकराविरुद्ध हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रियकराच्या धमकीमुळे युवतीचे आई-वडील दहशतीत आले आहेत. सुभाष रामटेके (२८) असे आरोपीचे नाव आहे. (The-boylover-threatened-the-mother-and-father-of-the-girlfriend)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी राधा (काल्पनिक नाव) दहावीत शिकते. वस्तीत राहणाऱ्या सुभाषसोबत तिची ओळख झाली. त्याने तिच्या एककोंड्या स्वभावाचा फायदा घेत बोलणे सुरू केले. तिचा मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर दोघांची चॅटिंग सुरू झाली. अल्पवयीन असलेल्या राधाला सुभाषने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. ती सुभाषशी चोरून बोलायची आणि भेटायची. सुभाषच्या प्रेमात राधा वेडी झाली होती. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तेव्हापासून तिची जीव सुभाषवर भाळला.

तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून सुभाषसोबत फिरणे सुरू केले. रात्रीच्या वेळी चॅटिंग करताना ती झोपी गेली. त्यावेळी तिच्या आईने मोबाईल हाताळला असता वस्तीतील सुभाषसोबत नको ती चॅटिंग तिला दिसली. दुसऱ्या दिवशी आईने तिला खूप रागावले आणि मोबाईलमधून सुभाषचा नंबर डिलीट करण्यास सांगितले. त्यानंतर सुभाषलाही घरी बोलावून समजूत घातली. ती लहान असून तिला प्रेमाची समज नाही, असे बोलवून मुलीचा पिच्छा सोडण्यास सांगितले.

हेही वाचा: दवाखान्यात गेली अन् गर्भवती निघाली; पालक पडले संभ्रमात

दुराव्याने वाढले प्रेम

राधाने सुभाषचा मोबाईल नंबर ब्लॉकमध्ये टाकला. परंतु, दोघांचेही प्रेम पुन्हा उफाळून आले. त्याने १५ वर्षांच्या राधाचे अपहरण करून लग्न करण्याची धमकी दिली. त्यामुळे तिचे आई-वडील काळजीत पडले. सुभाष गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे राधाच्या आईने हुडकेश्‍वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी धमकी देऊन पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

(The-boylover-threatened-the-mother-and-father-of-the-girlfriend )

loading image