esakal | आज थंडावणार प्रचारतोफा
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

नागपूर : आज थंडावणार प्रचारतोफा !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा (Elections) प्रचार (रविवार) सायंकाळी १० वाजता संपेल. त्यानंतर छुप्या बैठकांवर उमेदवारांचा जोर असणार असल्याचे सांगण्यात येते. ५ ऑक्टोबरला (October) मतदान (Voting) होणार असून ६ ला मतमोजणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसी वर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे या जागांवर नव्याने पोट निवडणुका होत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या पहिल्याच निवडणुका होत असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करून लढत असून शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. रविवार हा प्रचाराचा अखेरचा दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी सकाळी प्रचार रॅली, दुपारी मेळावे व सायंकाळी सभांचे नियोजन आखले आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सुनील केदार यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे, रश्मी बर्वे, सुरेश भोयर आहे. शनिवारी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा: पश्चिम बंगाल : दिलीप घोष यांच्यावर हल्ला; निवडणूक पुढे ढकलण्याची भाजपची मागणी

भाजपाच्या प्रचाराची धुरा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार समीर मेघे, टेकचंद सावरकर व जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यावर आहे. काटोल नरखेडात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराची गोची झाली आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रात जि.प.च्या दोन जागेवर निवडणुका आहे. शिवसेनेचे आमदार आशिष जैस्वाल यांनी रामटेक व पारशिवनी तालुक्यात फोकस केले आहे.. रविवारी सकाळपासूनच उमेदवारांच्या प्रचाररॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होईल.

हेही वाचा: बेळगाव : अख्ख्या शहराचा भार एकाच अग्निशमन केंद्रावर

सोमवारी साहित्य पोहोचणार केंद्रावर

१११५ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. १६ पेक्षा जास्त उमेदवार एकाही मतदार संघात नसल्याने सर्व ठिकाणी एकच कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट राहणार आहे. सर्व ईव्हीएमची तपासणी झाली असून सोमवारला सर्व साहित्य केंद्रावर पोहोचते होईल. निवडणुकीकरिता ३३४५ कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

loading image
go to top