esakal | बेळगाव : अख्ख्या शहराचा भार एकाच अग्निशमन केंद्रावर
sakal

बोलून बातमी शोधा

belgaon

बेळगाव : अख्ख्या शहराचा भार एकाच अग्निशमन केंद्रावर

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव : शहर आणि तालुक्याचा विचार करता बेळगावात दोन अग्निशमन ठाणी हवीत. पण केवळ एकाच शहर ठाण्यावर आजही बेळगाव शहर आणि तालुक्याचा भार पडलेला आहे. त्यामुळे वेळेत घटनास्थळी पोहचणे जवानांना देखील अवघड ठरू लागले असून नुकसानीचा आकडा वाढतो आहे.

रेल्वे ओव्हर ब्रीज इथे अग्निशमन शहर ठाणे आहे. बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघासह ग्रामीण मतदार संघातील अनेक गावे देखील या एकाच अग्निशमन ठाण्यावर अवलंबून आहेत. सद्या भूतरामनहट्टी गावच्या पुढे एकस कंपनीने एक छोटे अग्निशमन केंद्र सुरू केले आहे. हलगा येथे सुवर्ण सौधमध्ये देखील एक केंद्र असून कित्तूर येथे नुकतेच एक नवे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा: इंदापूर: तक्रार निवारण दिनी ६६ तंटे मिटविण्यात पोलिसांना यश

पण त्याचा बेळगाव शहरासाठी कोणताही उपयोग नाही. सांबरा विमानतळावर विमानतळ प्राधिकरणचे स्वतंत्र अग्निशमन केंद्र आहे. तर वायुदलाचे देखील स्वतःचे सांबरा वायुसेना तळावर केंद्र आहे. वायुसेनेकडून परिसरातील मुतगा, बाळेकुंद्री, सांबरा येथे एखादी आगीची घटना घडल्यास तातडीने धाव घेतली जाते. शहरात आणि तालुक्याच्या पश्चिम भागात आगीची घटना घडल्यास त्यासाठी केवळ शहर अग्निशमन केंद्रावर विसंबून रहावे लागते.

शहरात उत्तर मतदार संघात एक अग्निशमन केंद्र असावे, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे आहे. पण त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मध्यंतरी रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम सुरु असताना उत्तर भागात ये-जा करण्यासाठी कोणताही सोयीचा मार्ग नसल्यामुळे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागील बाजूला तात्पुरते शेड उभारून अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले होते.

हेही वाचा: कऱ्हाडात सौर ऊर्जा प्रकल्प लालफितीत; पालिकेची 90 कोटींची होणार बचत

मात्र या कालावधीत उत्तर भागात आगीची घटना घडताच जवान वेळेत पोचत होते. त्यामुळे याच परिसरात एक केंद्र सुरू केल्यास ते शहर आणि पश्चिम भागासाठी फायदेशीर ठरू शकते.

बेळगावात उत्तर भागात एक अग्निशमन केंद्र सुरू करण्याचा जुना प्रस्ताव आहे. पण त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसे झाल्यास एक केंद्रावरच असलेला भार कमी होऊ शकतो. तसेच वेळेत जवान घटनास्थळी पोचू शकतात. ज्यामुळे आगीपासूनचे होणारे नुकसान आणखी कमी होईल.

- व्ही. एस. टक्केकर, अग्निशमन अधिकारी

loading image
go to top