esakal | राधेशाम महाराजांच्या अनाम महासरोवर महाकाव्याचे प्रकाशन होणार राष्ट्रपतींच्या हस्ते
sakal

बोलून बातमी शोधा

राधेशाम महाराजांच्या महाकाव्याचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते

राधेशाम महाराजांच्या महाकाव्याचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेला (जि. नागपूर) : संत कोलबा स्वामी, संत बालयोगी रामचंद्र महाराज, संत इस्तरी महाराज, संत माधव महाराज, संत नगाजी महाराज अशा अनेक संतांनी जन्म घेऊन बेलाला पावनभूमी बनवले आहे. त्यातच संत कोलबा स्वामी मठाचे मठाधिपती राधेशाम महाराज हे कोलबास्वामींचे शिष्य आहे. त्यांचा जन्म १९५३ मध्ये नागपूर येथे झाला. बालपणापासून देशभक्ती आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे कोलबा स्वामींच्या सानिध्यात आले आणि शिष्य झाले. खापा आणि बेला येथील मठाचे मठाधीश झाले. लेखन आणि कवितेचा छंद असल्यामुळे त्यांनी अनेक काव्य लिहिले. यात अनाम महासरोवर (Anaam-Mahasarovar) राधेश्याम महाराजांचे ५०० पानाचे महाकाव्याचे पुस्तकात रूपांतर केले. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शिफारस केल्यामुळे अनाम महासरोवर या महाकाव्याचे प्रकाशन (Publication of the epic) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते होणार आहे. (The-epic-will-be-published-by-the-President-on-Radhesham-Maharaj's-Anaam-Mahasarovar)

लोकांचा संताबद्दल विश्‍वास दृढ करण्याचा प्रयत्न केला असून, विचार मांडला आहे. त्यातूनच समाज सुधारणा व भारत मातेविषयी प्रेम निर्माण करण्याचा संत राधेश्याम महाराजांनी प्रयत्न केला आहे. बेला भगवान कोलबा स्वामी पिठाचे पिठाधिश्‍वर गुरुस्वामी विश्‍व मिशनचे मुख्य आचार्य सद्गुरू समर्थ राधेश्याम स्वामी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कृत मंत्रालय, मुंबई यांना अपंग महारोगी बंधू भगिनींची सेवा केल्याबद्दल मानाचा पुरस्कार पुणे येथे मिळाला आहे.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

त्यांचा निसर्गरम्य कडजना तीर्थक्षेत्री बालयोगी रामचंद्र महाराज जन्मस्थान आहे अशा पवित्र नगरीत सद्गुरू राधेशाम स्वामी वास्तव्याला असतात ते मूळचे श्रीक्षेत्र खापा येथील आहेत. सर्वधर्मसमभाव यांनी अपक्ष तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत. समाज, देश, राष्ट्र, कुष्ठरोग रुग्ण बंधू भगिनींची सेवा करता यावी यासाठी खापा येथे अनाथ अपंग कुष्ठरोग रुग्ण यांचा आर्शम आहे. त्यांच्या अत्यंत वेदनांच्या गर्भातून महाकाव्य कमळपुष्प क्रांतीचा तेच ओज साज घेऊन उमगलेला आहे. त्यांच्या सेवा कार्यात गुरूमागली रमादेवी या सक्रिय असतात. यासाठी व बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणीनुसार रात्रंदिवस चंदनासारखे दिसत असतात.

समाज भारतीय जातीचे कल्याण देवरावजी मते हे संपादक आहे. या महाकाव्याचा सुप्रसिद्ध कवी कविवर्य पद्मश्री नारायणराव सुर्वे यांची प्रस्तावना आहे. विद्यावाचस्पती ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कुलगुरूचा अभिप्राय आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शिफारशीने महाकाव्याचे प्रकाशन लवकरच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

पुरोगामी प्रखर आचार-विचार

कोरोना कमी होताच प्रकाशनाची तारीख कळविली जाईल, असे त्यांनी कळविले आहे. महाकाव्य रचिते राधेश्याम महाराजांसोबत नाशिक विद्यापीठाचे सदस्य रत्नाकर धामणकर, सुशील धार्मिक यांना हजर राहण्याचे आवाहन केले आहे. महाकाव्यात प्रांत दर्शक पुरोगामी प्रखर आचार-विचार आहेत, असे राधेश्याम महाराजांनी सांगितले.

(The-epic-will-be-published-by-the-President-on-Radhesham-Maharaj's-Anaam-Mahasarovar)

loading image