Untimely rains in Nagpur| सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Untimely rains
सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

नागपूर : सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून पूर्व व पश्चिम विदर्भात (East and West Vidarbha) अवकाळी पाऊस (Untimely rains) व गारपिटीने शेतकर्‍याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, हरबरा, तूर, गहू, संत्रा, मोसंबी ही पिके शेतकऱ्यांच्या (farmer) हातातून गेली. पण शासनदरबारी अजून कोणतीच दखल घेतली गेली नाही. विदर्भातील शेतकर्‍याला महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने वाऱ्यावर सोडले, असा आरोप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

हेही वाचा: शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळं ६७ कष्टकऱ्यांचा जीव गेला - सदावर्ते

गारपीट होऊन तीन दिवस लोटले आहेत. पण अजून पालकमंत्र्यांनी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला नाही. त्यामुळे पंचनामे झाले नाहीत व पंचनामे करण्याचे आदेशही निघाले नाहीत. या सरकारला राजकारण करायला वेळ आहे. पण नुकसानग्रस्त भागाचे दौरे करायला वेळ नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विदर्भात गारपीट झाली की नाही याची याचीसुद्धा माहिती नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचे झालेले नुकसान पाहणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहून त्याला दिलासा देण्याची ही वेळ आहे. नेमक्या याच वेळी शासनाने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा: मराठीचा वापर करण्याची सूचना देणारा आदेशच इंग्रजीमध्ये

ओबीसींना सर्वाधिक न्याय

भाजपने देशात ओबीसींना सर्वाधिक न्याय दिला. देशाच्या मंत्रिमंडळात २७ पेक्षा अधिक मंत्री ओबीसी आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना आरक्षण दिले. नॉन क्रिमीलेअरच्या विद्यार्थ्यांना सवलती दिल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले. ओबीसींचे आरक्षण नाकारले असा आरोप करून भाजपाला बदनाम करण्याचे काम काही नेते करीत आहेत. त्यांना जनता निश्चितपणे धडा शिकवेल, असेही बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top