नागपूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू पन्नाशीनंतरचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients
नागपूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू पन्नाशीनंतरचे

नागपूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू पन्नाशीनंतरचे

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला. त्यानुसार कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. कोरोनाबाधितच्या रुग्णसंख्येत गतीने वाढ सुरू झाली. नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा आलेख बऱ्यापैकी वाढला. अवघ्या २२ दिवसांमध्ये ३३ हजार व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला. तर १ ते २२ जानेवारी या कालावधीत ४० जण मृत्यू झाले असून २७ पुरुषांचा तर १३ महिलांचा मृतकांमध्ये समावेश आहे. विशेष असे की, सर्वच वयोगटातील मृत्यूची नोंद असली तरी सर्वाधिक २९ मृत्यू पन्नाशीनंतरच्या वयोगटातील असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा: नाना पटोलेंचे ते ‘मोदी’ बगडगंजचे रहिवासी

तिसऱ्या लाटेतील पहिला कोरोनाचा मृत्यू ११ जानेवारी २०२२ रोजी झाला. यानंतर सातत्याने कोरोनाचे मृत्यू होत आहेत. प्रारंभी एक किंवा दोन मृत्यू होत होते. मात्र १६ जानेवारीला ३, १७ जानेवारीला ४ जण दगावले. यानंतर मात्र कोरोनाच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. १९ जानेवारीला ५ तर २० जानेवारीला ६ आणि २१ जानेवारीला ७ कोरोनाचे मृत्यू झाले. तर शनिवारी २२ जानेवारीला ८ जणांचा कोरोनाने बळी घेतला. अशाप्रकारे मागील ४ दिवसांमध्ये कोरोनाचे २२ मृत्यू झाले. यामुळे प्रशासन हादरले आहे. कोरोनामुळे मागील २२ दिवसांत दगावलेल्या ४० बाधितांपैकी कोरोनाचे शहरातील २९ बळी आहेत. ग्रामीण भागातील ९ आणि जिल्ह्याबाहेरच ८ जणांचा या मृतकांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा: मोदी व्यवस्थेला संपवण्यासाठी एकत्र या; नाना पटोलेंचे आवाहन

कोरोना मृत्यूचे विश्लेषण

  1. कोरोनासह मधुमेह,रक्तदाब हृदयरोग असलेले (कोमार्बिड) मृत्यू - २९

  2. निव्वळ कोरोनामुळे झालेले मृत्यू -३

  3. मृतावस्थेतील कोरोनाबाधित शव - ८

Web Title: The Highest Number Of Corona Deaths In Nagpur Is After Age Of 50

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top