वर्धा : विद्यार्थी सुरक्षा धोरणानुसार सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. .सातारकरांवर पाणी कपातीचे संकट.दरम्यान, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८०९ पैकी १० ते १२ शाळांतच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. परिणामी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित न केल्यास खासगी शाळांच्या मान्यता रद्दीच्या कार्यवाहीला शाळांना सामोरे जावे लागणार आहे.कूण ९७२ शाळा असून यातील केवळ ३३ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अनुदानित ३११ शाळा असून यातील १६१ शाळांत सीसीटीव्ही तर विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यीत १७७ शाळा असून यातील १४० शाळांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अनुदानित व विनाअनुदानित अर्थसहाय्यीत शाळांच्या तुलनेत कॅमेरे बसविण्यात निधीअभावी पिछाडीवर असल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येते..गत काही दिवसांपासून शालेय मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुसार, आता सरकारनेही यावर कडक पावले उचलली आहेत. यामुळे राज्यातील खासगी व्यवस्थापन, जिल्हा परिषदांसह सर्व शाळांसाठी शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत, अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे..शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणेही आवश्यक करण्यात आले आहे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवरच सोपवण्यात आली आहे. शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. ज्या शाळांकडून हलगर्जीपणा करण्यात येईल, अशा शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या कारवाईचा मार्ग शालेय शिक्षण विभागाकडून अवलंबण्यात येणार आहे. यामुळे शाळांनी विविध प्रकारच्या निधीचा वापर करून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे..कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणीशालेय मुलींवर अत्याचाराच्या घटना लक्षात घेता शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळांतील १२३, अनुदानित १८१ तर विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यीत २८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या चारित्र्याची पडताळणी झाल्याने शाळांतील मुली कितपत सुरक्षित, असा प्रश्न निर्माण झाला आहे..Amravati News : सामूहिक बदलीचा निर्णय मागे .शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांना सुरक्षेवर उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून निधी मिळावा याकरिता पाठपुरावा शिक्षण विभागाकडून सुरू आहे.— नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. वर्धा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.