esakal | बुधवारी मुलांना क्लिनिकल चाचणीचा दुसरा डोस
sakal

बोलून बातमी शोधा

बुधवारी मुलांना क्लिनिकल चाचणीचा दुसरा डोस; दुष्परिणाम नाही

बुधवारी मुलांना क्लिनिकल चाचणीचा दुसरा डोस; दुष्परिणाम नाही

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने शून्य ते १८ वयोगटातील लहान मुलांवरील कोरोना प्रतिबंधात्मक लसीची क्लिनिकल चाचणी सुरू (Clinical trials of the vaccine begin) केली आहे. नागपुरातील मेडिट्रीना हॉस्पिटल येथे ही चाचणी सुरू आहे. ६ ते १२ वयोगटातील मुलांना लसीचा पहिला डोस (The first dose of vaccine for children between the ages of 6 and 12) देऊन २८ दिवस पूर्ण होत आहेत. काही मुलांचे रक्ताचे नमुने घेऊन ते दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. विशेष असे की, एकाही मुलात दुष्परिणाम दिसून आला नाही. (The-second-dose-of-clinical-trial-in-children)

जून महिन्यात देशभरात लहान मुलांवर लसीची चाचणी सुरू करण्यात आली. त्या नागपूरचाही समावेश आहे. ० ते ६, ६ ते १२ व १२ ते १८ या वयोगटांमध्ये मुलांचे गट पाडून ही लस चाचणी सुरू झाली. सर्वात आधी ६ जून रोजी १२ ते १८ वयोगटातील ४१ मुलांना लसीचा पहिला डोस दिला. त्यानंतर २८ दिवसांनी (४ जुलै) त्यांना दुसरा डोस देण्यात आला.

हेही वाचा: शिवसेनेला विदर्भाशी काही देणे-घेणे नाही; लबाड लोकांची फौज

या वयोगटातील बहुतांशी मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले. १६ जून रोजी येथे ६ ते १२ वयोगटातील २५ मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. आता बुधवारी या मुलांना लसीचा पहिला डोस देऊन २८ दिवस पूर्ण होत असून, त्यांना गुरुवारी १५ जुलैला दुसरा डोस देण्यात येणार आहे.

दोन दिवसांत ६ ते १२ वयोगटातील मुलांना दुसरा डोस देण्यात येईल. यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने दिल्ली येथे पाठविण्यात येतील. तीनवेळा नमुने घेण्यात येईल. याशिवाय मुलांना डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येत आहे.
- डॉ. वसंत खळतकर, समन्वयक, क्लिनिकल ट्रायल लसीकरण

(The-second-dose-of-clinical-trial-in-children)

loading image