esakal | नात्याला काळिमा! बापाचे मुलीशी चाळे तर बहिणीचे काढले अश्लील फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

नात्याला काळिमा! बापाचे मुलीशी चाळे तर बहिणीचे काढले अश्लील फोटो

नात्याला काळिमा! बापाचे मुलीशी चाळे तर बहिणीचे काढले अश्लील फोटो

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या दोन घटना नागपुरात समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत बापानेच मुलीशी अश्‍लील चाळे (The father made obscene with daughter) करीत लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केला. दुसऱ्या घटनेत २२ वर्षीय बहीण आंघोळ करीत असताना मोबाईलने तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले (Nude photos and videos removed). रक्ताच्या नात्याला कलंकित करणाऱ्या या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे जवळच्या नात्यातील लोकांपासूनही घरातील मुली सुरक्षित (Girls not safe) नसल्याचे दिसते. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांकडे कोणताही मार्ग नाही. समाजाने अशा घटना घडल्यानंतर आक्रमक पवित्रा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (Incidents-that-tarnished-blood-relations-in-Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम पित्याला पत्नी आणि मुलगी आहे. तो टेलरिंगचे काम करतो तर पत्नी खासगी काम करते. रात्रीच्या वेळी आई आणि मुलगी झोपली असताना बाप हा मुलीजवळ झोपायचा आणि अश्‍लील चाळे करीत होता. २५ मे पासून त्याने तीन-चारदा असे प्रकार केले. परंतु, पत्नीने फारसे लक्ष दिले नाही.

हेही वाचा: ‘मैं चोर नही हूं’ असे हातावर लिहून ट्रक चालकाने संपवले जीवन

रविवारी रात्री मुलगी आईजवळ झोपली असताना बापाने मुलीचे कपडे काढले आणि अश्‍लील चाळे केल्याने मुलगी ओरडली. त्यामुळे आईला जाग आली. आईने नवऱ्याला शिव्या देऊन घराच्या बाहेर हाकलले. सोमवारी मुलीची आई गिट्टीखदान परिसरात असताना आरोपीने सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. आईच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

दुसऱ्या घटनेत १८ वर्षे पूर्ण होण्यास काही दिवस बाकी असलेला युवक दहावीत शिकतो. तो तहसीलमध्ये राहतो. त्याच्या मोठ्या वडिलाचे घर बाजूलाच आहे. त्याला २२ वर्षांची चुलत बहीण आहे. तिच्यावर मुलाची वाईट नजर होती. तो तिच्याशी नेहमी वेळ घालवत होता. परंतु, काकाचा मुलगा असल्यामुळे त्याच्या हालचाली आणि गमतीकडे ती दुर्लक्ष करायची.

हेही वाचा: चमत्काराची प्रतीक्षा! आजारी निकिताचा मुलीत अडकला जीव

काही दिवसांपूर्वी तो तिच्या घरी आला. त्यावेळी बहीण आंघोळीला गेली होती. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. बाथरूमच्या दरवाज्याच्या फटीतून त्याने बहिणीचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ काढला. शारीरिक आकर्षण असल्यामुळे काही दिवस त्याने मोबाईलमध्ये ठेवले. बहिणीलाच ब्लॅकमेल करीत शारीरिक संबंधाची मागणी करण्याचा त्याचा विचार होता. मात्र, त्याची हिंमत झाली नाही.

त्याने तो व्हिडिओ एका मित्राला दाखवला. परंतु, तो मित्र त्याच्या घरी आल्यानंतर व्हिडिओतील तरुणी म्हणजे व्हिडिओ सेंड करणाऱ्याची बहीण असल्याचे लक्षात आले. अपराधीपणाची भावना निर्माण झाल्याने मित्राने तो व्हिडिओ तरुणीच्या वडिलांना दाखवला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

(Incidents-that-tarnished-blood-relations-in-Nagpur)

loading image