Chadoli Dam: धुवाधार पावसानंतर किती भरले चांदोली धरण, नविन आकडेवारी आली समोर

Sangali: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम सुरू आहे.
Chadoli Dam: धुवाधार पावसानंतर किती भरले चांदोली धरण, नविन आकडेवारी आली समोर
Chadoli Damsakal
Updated on

Shirala: दोन दिवस शिराळ्यासह तालुक्यात पावसाने थोडी उसंती घेतली असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम सुरू आहे.

चांदोली उद्यानातील ओढे-नाले नैसर्गिक उमाळ्याने प्रवाहित झाल्याने धरणात पाण्याची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या धरणात ७९३० क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने आज मंगळवारी चांदोली धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.

Chadoli Dam: धुवाधार पावसानंतर किती भरले चांदोली धरण, नविन आकडेवारी आली समोर
Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी आहे. सध्या धरणात १७.०८ टी.एम.सी.म्हणजे ४९.६४ टक्के पाणीसाठा झाला असल्याने धरण ५० टक्के भरले आहे. आठ दिवसांपासून कोकरूड रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. कोकरूड येथे येण्यासाठी तुरुकवाडी मार्गे सुमारे १० किलोमीटर प्रवास करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने पाण्या अभावी रखडलेली रोपं लावणीची कामे गतीने सुरु झाली आहेत.

Chadoli Dam: धुवाधार पावसानंतर किती भरले चांदोली धरण, नविन आकडेवारी आली समोर
Harnai Khem Dam : १८ तास उलटूनही हर्णै खेम धरणात बुडालेल्या मुलाचा अजूनही लागला नाही शोध

धरणातील पाणीसाठा

आज सकाळी ७ वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ६०६.२५ मीटर तर पाणीसाठा ४८९.५७ द.ल.घ.मी. होता. धरणात १७.०८ टी.एम.सी. म्हणजे ४९.६४ टक्के पाणीसाठा झाला होता.त्यामुळे चांदोली धरण ५० टक्के भरले आहे.

Chadoli Dam: धुवाधार पावसानंतर किती भरले चांदोली धरण, नविन आकडेवारी आली समोर
Bhushi Dam Accident Lonavala : पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.