esakal | ‘त्या’ निवडणूक याचिकेत तथ्य नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

‘त्या’ निवडणूक याचिकेत तथ्य नाही : आमदार राणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बडनेऱ्याचे (जि. अमरावती) मतदार सुनील खराटे यांनी मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाच्या (high Court) नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका प्राथमिक टप्प्यात खारीज करण्याची विनंती आमदार राणा यांनी न्यायालयाला केली. याचिकेत कुठलेही तथ्य नाही, असेही न्यायालयात बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी नमूद केले.

या प्रकरणी न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या समक्ष सुनावणी झाली. ऑक्टोबर-२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदी व भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करून विजय मिळवला. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. आमदार राणा यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या आदेशातील नियम ११ अंतर्गत अर्ज दाखल करीत याचिका खारीज करण्याची विनंती केली. राणा यांच्याविरुद्ध खराटे यांच्यासह मतदार आशिष धर्माळे यांनीदेखील निवडणूक याचिका दाखल केली.

हेही वाचा: आमदार रवी राणा यांना उत्तर दाखल करण्याची शेवटची संधी

या दोन्ही निवडणूक याचिकांतील प्रतिवादींमधून नाव वगळण्याकरिता भारतीय निवडणूक आयोग व निवडणूक अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले. न्यायालयाने मंगळवारी राणा व याचिकाकर्त्यांना या अर्जांवर २४ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. निवडणूक आयोगातर्फे ॲड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.

loading image
go to top