थिनर, आयोडेक्स, ग्लूमधून चढते नशेची ‘झिंग’

विनाप्रतिबंधित पदार्थामुळे पोलिसांसमोर कारवाईचे आव्हान
Drug
Drug sakal

नागपूर : चित्रपट अभिनेत्याच्या मुलाच्या अटकेनंतर अमली पदार्थाचा विषय अधिक ऐरणीवर आला आहे. मात्र, विना प्रतिबंधित असलेल्या नेलपेंट रिम्युव्हर, आयोडेक्स, पंचरचे सोल्यूशन, पेंट आणि ग्लूचासुद्धा नशेसाठी वापर केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. अशा पदार्थांच्या विक्रीस कोणतेही प्रतिबंध नसल्यामुळे युवापीढीसह अल्पवयीन मुलेसुद्धा नशेच्या आहारी गेले आहेत.

Drug
काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

हेरॉइन, ब्राऊन शुगर, हसीश, चरस, एमडी, ब्रूक अशा पावडरची नशा करण्याचा युवकांमध्ये ट्रेंड आहे. निकोटिनशिवाय, केटामाइन, मॅजिक मशरूम, एमडी व मॅफ्रेडॉनसारख्या अमली पदार्थाच्याही विळख्यात तरुणाईसोबत आता विद्यार्थीही अडकले आहेत. हे सर्व ड्रग्ज खूप महागडे असल्यामुळे यामध्ये श्रीमंतांच्या मुला-मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच काही दलाल तरुणींना या नशेची सवय लावतात. एकदा का ड्रग्जची सवय लागली तर तरुणी नशा करण्याची तयारी दर्शवितात. तसेच ड्र्ग्ज मिळविण्यासाठी मैत्रिणी,अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन मित्र तरुणींना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बाध्य करतात. मात्र, झोपडपट्टी किंवा मध्यमवर्गीय युवा पिढीमध्ये असे महागडे व्यसन करणे परवडत नाही. त्यामुळे जे पदार्थ सहज उपलब्ध होतात आणि किमतीत स्वस्त असतात, अशा पदार्थांची नशा युवक करताना दिसतात. त्यामुळे व्हाइटनर, ग्लू, पेंट, ड्रायक्लिनिंगचे केमिकल, बॉण्ड, आयोडेक्स, स्टिकफास्ट, फेविक्विक, गॅसोलिन, हेअरस्प्रे, डिओड्रंट, थिनर, नेलपेन्ट रिमूव्हर, पर्मनंट मार्कर आणि पंचर बनविण्याचे सोल्यूशन खाऊन नशेची झिंग चढवतात. सध्या या व्यसनाचा ट्रेंड वाढला आहे. नशेची धुंदी करणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

कसे घेतले जातात ड्रग्ज

‘डायरेक्ट अ‍ॅप्लिकेशन'' म्हणजे अमली पदार्थ थेट नाकात किंवा तोंडात स्प्रे केल्या जाते. मनगटाला, बोटाला किंवा शर्टच्या कॉलरला लावल्या जाते. रुमालास लावून नाकाने मोठा श्‍वास घेऊन वास घेतल्या जाते. ‘बॅगिंग’ म्हणजे कागद किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत तो पदार्थ ठेवून त्यातून नाकाने आणि तोंडाने वाफारा घेणे. ''हफिंग'' म्हणजे ड्रग्ज किंवा नशेचा पदार्थाने भिजवलेला कपड्याचा तुकडा तोंडात ठेवणे. ‘स्निफिंग’ म्हणजे तो पदार्थ ज्या कंटेनरमध्ये आहे त्याचा नाकाने वास घेणे.

असे ओळखा नशेखोर

नशेच्या पदार्थात असणाऱ्या रसायनात ब्युटेन, क्लोरोफ्लूरो कार्बन यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे थेट मेंदूला ‘किक’पोहोचते. शाळकरी मुलांच्या कपड्यांवर पेंट किंवा ऑइलचे डाग असतील, ते जवळ आल्यावर एखाद्या केमिकलचा वास येत असेल, त्यांच्या तोंडाच्या आजूबाजूला चट्टे किंवा जखमा असतील, नाकातून वारंवार पाणी वाहत असेल, डोळे लाल दिसत असतील, नजर भिरभिरती असेल, नखांवर डाग असतील, एवढ्यात स्वभाव चिडचिडा झाला असेल, बोलण्यात अडखळत असतील तर ती मुले हमखास अशी नशा करीत असल्याचे समजावे.

पोलिसांसमोर कारवाईचे आव्हान

व्हाईटनर, ग्लू, पेंट, ड्रायक्लिनिंगचे केमिकल, आयोडेक्स, स्टिकफास्ट, फेविक्विक, हेअरस्प्रे, डिओड्रंट, थिनर, नेलपेन्ट रिमूव्हर, पर्मनंट मार्कर आणि पंचर बनविण्याचे सोल्यूशन हे सर्व पदार्थ दुकानात किंवा फार्मसीत सहज उपलब्ध होतात. असे पदार्थ विक्रीवर कोणतेही प्रतिबंध नाही. त्यामुळे मुलांकडे असे पदार्थ सापडल्यास कारवाई करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने पोलिसांसमोर आता हे नवे आव्हान ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com