Weather Update : नागपूरकरांसाठी हा उन्हाळा कमी ‘ताप’दायक

पाऱ्याने एकदाही गाठली नाही ४५ अंशाची पायरी; यंदा कमाल तापमान ४३.३
This summer Nagpur mercury never reached 45 degree  maximum temperature 43 weather
This summer Nagpur mercury never reached 45 degree maximum temperature 43 weatheresakal

नागपूर : विदर्भातील कडक उन्हाळा म्हटला की अनेकांची लाहीलाही होते. या ‘घामफोड’ दिवसांमध्ये कुणीही पाहुणपणासाठी सहसा विदर्भात पाय ठेवण्याची हिंमत करत नाही. दरवर्षी पारा ४६-४७ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी घेतो. मात्र यंदाचा उन्हाळा नागपूरकरांसाठी तुलनेने सुसह्य ठरला आहे.

यावर्षी नागपूरच्या तापमानाने एकदाही ४५ अंशची पायरी गाठली नाही. ऊन-सावल्यांच्या खेळामुळे यंदाचा उन्हाळा या दशकातील दुसरा सर्वाधिक सुसह्य उन्हाळा ठरला. नवतपासोबतच विदर्भातील उन्हाळा संपून हळूहळू मॉन्सूनचे वेध लागतात.

आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांचा अपवाद वगळता यंदा नागपूरकरांना उन्हाळा फारसा जाणवलाच नाही. चार महिन्यांत एकदाही नागपूरचा पारा ४५ अंशांवर गेला नाही.१४ मे रोजी नोंद झालेले ४३.३ अंश सेल्सिअस तापमान यंदाचे सर्वाधिक तापमान ठरले.

This summer Nagpur mercury never reached 45 degree  maximum temperature 43 weather
Monsoon Update : अरबी समुद्रात चक्रीवादळाचे मॉन्सूनवर सावट; हवामान विभागाचा अंदाज

हा अपवाद वगळता उन्हाचे चटके जाणवलेच नाही. विदर्भातील ‘हॉट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला, अमरावती, चंद्रपूर व अन्य एक-दोन जिल्ह्यांमध्ये ४५ किंवा त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली.

अवकाळी पावसाची हजेरी

नागपूरच्या गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास यावर्षीचा उन्हाळा कमी तापदायक ठरला. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२१मध्ये नागपूरचे कमाल तापमान ४३.९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते.

This summer Nagpur mercury never reached 45 degree  maximum temperature 43 weather
Weather Update : टीव्ही, रेडिओवरूनही मिळणार हवामानाचा इशारा; ‘एनडीएम’चा उपक्रम; नागरिकांना सावध करणार

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यानुसार, विदर्भातील उन्हाची लाट मुख्यत्वे राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांवर अवलंबून असते. कोरडे वातावरण असेल तरच उष्णलाट येऊन तापमानात वाढ होते. या उन्हाळ्यात ते चित्र पाहायला मिळाले नाही. अवकाळी पावसाची अधूनमधून हजेरी हे उन्हाची तीव्रता कमी होण्याचे हे मुख्य कारण ठरले.

गेल्या दहा वर्षांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

वर्ष - तापमान

२०१३ -४७.९

२०१४- ४४.६

२०१५- ४७.१

२०१६- ४६.६

२०१७- ४६.२

२०१८ -४६.७

२०१९- ४५.७

२०२०- ४७.०

२०२१ -४३.९

२०२२- ४६.२

२०२३- ४४.३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com