Nagpur News: बोगस शालार्थ आयडी घोटाळा; आणखी तीन शिक्षक अटकेत, सायबर पोलिसांची धडक कारवाई सुरूच
Teacher Scam: नागपूरमधील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात आणखी तीन शिक्षकांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन महिला शिक्षकांचा समावेश आहे. सायबर पोलिसांच्या तपासात त्यांच्याकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन घेतल्याचे उघड झाले आहे.
नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर गुरुवारी विशेष तपास पथकातील (एसआयटी) सायबर पोलिसांनी गुरुवारी (ता.३१) दुपारी दोन शाळांतील तीन सहाय्यक शिक्षकांना अटक केली. आतापर्यंत १४ जणांना एसआयटीने अटक केली आहे.