चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मेंडकी वनक्षेत्रात वाघाने अक्षरश शरीराचे तुकडे तुकडे केल्याचं आढळून आलंय. या घटनेनं खळबळ उडाली असून वनअधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. गेल्या दोन महिन्यापासून चंद्रपूरमध्ये काही भागात वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. चिमूर वन परिक्षेत्रात दोन महिन्यात तिघांचा बळी गेला आहे. यातच आता मेंडकी वनपरिक्षेत्रात घडलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.