esakal | नागपूर जिल्ह्यातील गुमथळ्यातून ‘कमळ’ बेपत्ता? अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची नामुष्की
sakal

बोलून बातमी शोधा

‘कमळ’ बेपत्ता? अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची नामुष्की

‘कमळ’ बेपत्ता? अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची नामुष्की

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे (Zilla Parishad elections) पडघम वाजू लागले असताना कामठी विधानसभा क्षेत्रातील (Kamathi Assembly constituency) गुमथळा सर्कलमध्ये सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या उमेदवाराचे चिन्ह गायब झाले आहे. अंतर्गत राजकारणामुळे (Internal politics) अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. अनिल निधान यांनी बंडखोरी केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली. अखेर त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली. मात्र, त्यांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. (Time-to-support-independent-candidate-on-BJP)

विशेष म्हणजे कामठी विभानसभा क्षेत्र भाजपचा आहे. ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे याच मतदार संघात राहतात. गेल्या वेळी गुमथळ्यातून अनिल निधान विजयी झाले होते. ते विरोधी पक्ष नेतेही राहिलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. परंतु, ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत योगेश डाफ यांचे नाव समोर केले.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

प्रथम निधान यांनी दुसऱ्यास संधी देण्यासाठी निवडणूक लढत नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, नंतर अनिल निधान यांनीही अर्ज दाखल केला. डाफ यांच्या अर्जासोबत ‘बी’ फॉर्म नव्हता. पत्ता कापल्याने निधान यांनी बंडखोरी केल्याची चर्चा रंगली. निधान यांच्यासोबत घात झाल्याची चर्चाही रंगली. यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचे सांगण्यात येते.

याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने पक्षाने भूमिका बदलली. त्यामुळे आज निधान यांना पक्षाकडून समर्थन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अंतर्गत राजकारणाचा फटका पक्षाला बसला. निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. राजकारण हा भाग नुसता जिल्हा परिषदेपुरता मर्यादित नसून समोरील विधानसभा निवडणुकीशी संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

अनिल निधान यांनी प्रथम निवडणूक न लढण्याची भूमिका घेतली. नंतर त्यांनी अर्ज भरला. त्यापूर्वी योगेश डाफ यांचे नाव देण्यात आले होते. तांत्रिक अडचणीमुळे ‘बी’ देण्यात आला नाही. निधान हे पक्षाचे उमेदवार असून त्यांना समर्थन देण्यात आले. इतर उमेदवार अर्ज मागे घेतील.
- अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजप

(Time-to-support-independent-candidate-on-BJP)

loading image
go to top