पर्यटन व्यवसायाला येणार ‘अच्छे दिन’

जंगल सफारी, थंड हवेची ठिकाणांवर गर्दी
Nagpur Tourism
Nagpur Tourismsakal

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेले निर्बंध आता टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षापासून घरात अडकून पडलेले पर्यटक आता समुद्रकिनारे, वने, थंड हवेच्या ठिकाणांना भेटी देत आहेत.

शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल झालेले आहेत. भारतातील प्रत्येक राज्यातील पर्यटनस्थळासाठी जोरात बुकिंग होत आहे. राजस्थान, केरळ, गोवा, अंदमान निकोबार, कश्मीर, मालदीव, कोकण, हिमाचल प्रदेश, वाराणसी या देशातील प्रमुख पर्यटनस्थळांसह विविध राज्यांतील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची गर्दी आता पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांच्या ओढ्यामुळे पर्यटन व्यवसाय तेजीत आला असून स्थानिकांना रोजगारही मिळत आहे. विदर्भातील निसर्ग पर्यटनही सुरु झालेले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून सुरु - बंद असलेल्या व्यवसायात आता बरे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत.

देशांतर्गत पर्यटन वाढू लागले असले तरी अद्यापही आंतरराष्ट्रीय विमाने सुरु झाली नाहीत. ही विमाने सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसायाला झळाळी मिळणार आहे. याशिवाय देशातही दोन लसी घेतलेल्यांना आता सर्वत्र फिरण्याची मुभा देण्यात आलेली आहे. नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे लसीकरण करून घेतलेले आहे. आरटीपीसीआरची अटही रद्द करण्यात आल्याने पर्यटन वाढले आहे.

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी पुढील एक ते दीड महिन्यासाठी हाऊस फुल्ल आहे. मार्च महिन्यापासून दहावी आणि बारावीच्या परिक्षा आहेत. त्या काळात दरवर्षी पर्यटकांची संख्या कमी असते. यंदा वर्षभर घरात बसलेले पर्यटक आता परिवारासह अथवा मित्रांसह जंगल सफारीला पसंती देत आहेत असे सृष्टी हॉलिडे होमचे संचालक स्वानंद सोनी यांनी सांगितले.

''कोरोनासोबतच जगायचे आहे असे निश्चित केल्याने नागरिक पर्यटनाला जाण्याचे मनसुबे आखत आहेत. त्यामुळे देशांतर्गत पर्यटन वाढू लागलेले आहे. इंधन दरवाढीने पर्यटन पॅकेजही वाढली आहेत.''

- विश्वनाथ उपाध्याय, टुरिझम एन्त्रोप्रेनेरर्स नेटवर्क

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com