esakal | विदर्भातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; महिला जिल्हाधिकाऱ्यांची संख्या झाली पाच
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

विदर्भातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकारने मंगळवारी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfers of IAS officers) केल्या आहेत. त्यात विदर्भातील सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे पवनीत कौर व निमा अरोरा यांच्या निमित्ताने विदर्भातील महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या संख्येत आणखी दोनने वाढ होऊन ही संख्या पाच (The number of women collectors in Vidarbha is five) झाली आहे. (Transfers-of-seven-IAS-officers-from-Vidarbha-nad86)

नागपूरचे जिल्हाधिकारी राहिलेले आर. एच. ठाकरे यांना नागपुरातच अतिरिक्त अदिवासी आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. तर नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दीपककुमार मीना यांना नियुक्त केले आहे.

अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची बदली मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; चतुष्कोन पूर्ण

अकोल्याचे जिल्हाधिकारी जे. एस. पापळकर यांना अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर विद्यमान मनपा आयुक्त श्रीमती निमा अरोरा यांना पापळकर यांच्या रिक्त जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अकोल्याच्या महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांची बदली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. याअगोदर विदर्भात विमला आर (नागपूर), नयना गुंडे (गोंदिया) व प्रेरणा देशभ्रतार (वर्धा) या तीन महिला जिल्हाधिकारी कार्यरत आहेत.

जलज शर्मा यांचीही बदली

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. चार दिवसांपूर्वीच त्यांची बदली करण्यात आली होती. नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या जागी विमला आर. यांनी पदभार स्वीकारला आहे. ठाकरे यांच्यासोबतच नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांचीही बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी नागपूर महापालिकेत दीपककुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(Transfers-of-seven-IAS-officers-from-Vidarbha-nad86)

loading image