esakal | घ्या बोंबला! वाहतूकमंत्री नितीन गडकरीच अडकले वाहतूक कोंडीत!
sakal

बोलून बातमी शोधा

घ्या बोंबला! वाहतूकमंत्री नितीन गडकरीच अडकले वाहतूक कोंडीत!

घ्या बोंबला! वाहतूकमंत्री नितीन गडकरीच अडकले वाहतूक कोंडीत!

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : शहरासह देशात प्रशस्त रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Union Land Transport Minister Nitin Gadkari) नागपूरमध्ये वाहतूक कोंडीत (Traffic jam) अडकले होते. गाडी पुढे जात नसल्याचे बघून ते रस्त्यावर उतरले आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. हा रोजचाच प्रकार असल्याने त्यांनी संबंधित कंत्राटदाराची चांगलीच खरडपट्टी काढली. (Transport-Minister-Nitin-Gadkari-stuck-in-a-traffic-jam)

पूर्व नागपुरातील श्री भवानी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटच्या लोकार्पण कार्यक्रमाला गडकरी जात होते. पारडी येथे सिमेंट रोड, त्यावर मेट्रो रेल्वे, पुढ्यात उड्डाणपुलाचे काम एकाचवेळी सुरू आहे. त्यामुळे एक मार्ग खोदून ठेवला आहे. दुसऱ्या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहे. या मार्गावरून प्रचंड वर्दळ असल्याने रोजच वाहतुकीची कोंडी होते. उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. ते पूर्ण करावे यासाठी यापूर्वी आंदोलनेसुद्धा झाली आहेत. परिसरातील नागरिक यामुळे किती त्रस्त आहेत याची प्रचिती खुद्द गडकरी यांनाच आली.

हेही वाचा: धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

गडकरी यांच्या गाड्यांचा ताफा पारडीच्या दिशेने जात असताना चौकातील वाहतूक कोंडीत अडकला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यात गडकरी कारच्या बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा रक्षकांचीसुद्धा धावपळ उडाली. गडकरी यांना बघून परिसरात असलेले नागरिक तेथे आले. त्यामुळे वर्दळ आणखीच वाढली. त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही तारांबळ उडाली. गडकरी यांनी सूचना देऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्यांचीही समजूत काढली. तसेच कंत्राटदाराला खडे बोल सुनावून उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले.

काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश

पारडीच्या उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश आपण दिले आहे. खाली रस्ता, मधात उड्डाणपूल आणि त्याच्या वरच्या भागातून मेट्रो रेल्वे धावणार आहे. याशिवाय ब्रॉडगेज मेट्रोही लवकरच सुरू होणार आहे. वर्धा येथे ३५ मिनिटात, भंडारा येथे ३५ मिनिटांत आपण पोहोचू शकणार असल्याचे उल्लेख नंतर कार्यक्रम स्थळी झालेल्या भाषणात गडकरी यांनी केला.

हेही वाचा: वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

गडकरींनी दिली होती तंबी

पारडी उड्डाणपुलाचे काम रखडल्याने नगरसेवकाच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला डांबण्यात आले होते. अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून संबंधित नगरसेवकाच्या विरोधात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची दखल गडकरी यांनी घेतली होती. चांगल्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्यास याद राखा अशी तंबीही गडकरी यांनी दिली होती.

(Transport-Minister-Nitin-Gadkari-stuck-in-a-traffic-jam)

loading image