Truck Drivers Protest : ट्रक चालकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण? नागपुरात रुग्णवाहिका हॉस्पिटल बाहेरच उभ्या

ट्रक चालकांच्या संपादरम्यान पेट्रोल पंप देखील बंद असल्याच्या अफवेमुळे लोकांनी भीतीपोटी पेट्रोल आणि डिझेल भरायला पंपांवरती प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
Truck Drivers Protest
Truck Drivers Protest

केंद्र सरकारच्या हीट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी कालपासून संप पुकारलेला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील ट्रक चालकांनी पुकारलेल्या या बंदाचे परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. या बंदामुळे आरोग्य व्यवस्थेवेर देखील ताण पडण्याची शक्यता आहे.

ट्रक चालकांच्या संपादरम्यान पेट्रोल पंप देखील बंद असल्याच्या अफवेमुळे लोकांनी भीतीपोटी पेट्रोल आणि डिझेल भरायला पंपांवरती प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल संपलेले आहे. यामुळे त्याचाच परिणाम रुग्णवाहिका सेवेवर देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Truck Drivers Protest
Truck drivers protest : बस-ट्रक चालकांचा संप, वाहतूक व्यवस्था ठप्प, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; काय आहे कारण?

ॲम्बुलन्ससाठी देखील डिझेल नसल्यामुळे नागपूरमध्ये मेयो रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने ॲम्बुलन्स उभ्या असल्याचे पाहायला मिळाले. वाहनात कमी पेट्रोल-डिझेल असल्याने रुग्णाला घेऊन जाताना मध्येट पेट्रोल संपलं तर करायचं काय असा प्रश्न असल्याने ॲम्बुलन्स उभ्या करण्यात आलेले आहेत. नागपूर येथील शासकीय मेयो हॉस्पिटल बाहेर अशा अनेक रुग्णवाहिका उभा असल्याचे पाहायला मिळत आहे.

ट्रकचालकांच्या संपाचं कारण काय?

केंद्र सरकारकडून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला असून या नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास ( हिट-अँड-रन ) तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याच शक्यता आहे. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. मात्र आता शिक्षेसोबत सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे.

Truck Drivers Protest
Truck Driver Strike: ट्रक चालकांच्या संपामुळे 'लालपरी'ला 'ब्रेक', 'या' आगारातील बस फेऱ्या रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com