esakal | आयुक्त तुकाराम मुंढे अज्ञातवासात.. शासनाला देत आहेत खोटी माहिती..कोणी केले हे गंभीर आरोप.. वाचा   
sakal

बोलून बातमी शोधा

Tukaram Mundhe always gives False Information blame BJP leader

शुक्रवारी महापालिकेची ऑनलाईन सभा पार पडली. स्थगन प्रस्तावावर बोलताना तिवारी यांची प्रशासनावर तोंडसुख घेतले. महापालिकेने क्वारंटाईन सेंटर तयार केले. परंतु येथेच निम्मे पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

आयुक्त तुकाराम मुंढे अज्ञातवासात.. शासनाला देत आहेत खोटी माहिती..कोणी केले हे गंभीर आरोप.. वाचा   

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असून बळींचा आलेखलाही उंचावत आहे. त्यात आता खाजगी रुग्णांनी नागरिकांची लूट सुरू केली. पॉजिटिव्ह रुग्णांना उपचार मिळत नाही. बेडसाठी प्रतीक्षा केली जात आहे. शहराच्या या चिंताजनक स्थितीत आयुक्त तुकाराम मुंढे मात्र अज्ञातवासात गेले असून प्रशासनही सुस्त झाल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केला. एवढेच नव्ह आयुक्त मुंढे शासनालाही खोटी माहिती पुरवित असून खोटे बोलणे त्यांचा स्वभावच असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

सविस्तर वाचा - मौजमजा करताना ‘ते’ बनले नावाडी, हाकली नाव आणि स्वतःचा ठरले कर्दनकाळ...

शुक्रवारी महापालिकेची ऑनलाईन सभा पार पडली. स्थगन प्रस्तावावर बोलताना तिवारी यांची प्रशासनावर तोंडसुख घेतले. महापालिकेने क्वारंटाईन सेंटर तयार केले. परंतु येथेच निम्मे पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. माहेश्वरी समाज हे कोविड सेंटर तयार करण्यासाठी तयार आहे. त्यांना आयुक्तांनी मंजुरी दिली. परंतु डॉक्टर आणि नर्सचा स्टाफ देण्यास असमर्थता दर्शविली. खंडेलवाल समाज, पाटीदार समाज, अग्रसेन समाज, गुजराती समाज या कामासाठी पुढाकार घेण्यास तयार आहे. परंतु, आयुक्तांचा आडमुठेपणा आड येत आहे. 

उपचाराचे दर निश्चित करुन देण्यात आल्यानंतरही खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी लुट केली जात आहे. खाजगी रुग्णालयात शासनाचे नियम पाळल्या जात आहे अथवा नाही, रुग्णांना निट उपचार निट मिळत आहे काय? यावर नियंत्रणासाठी कुठली यंत्रणा आहे?रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर स्क्रिनिंग होणे महत्वाचे असते. ताप व ऑक्सीजनबाबत तपासणी केली पाहिजे, परंतु महापालिकेकडे अशी व्यवस्था नाही. 

आरोग्यासोबत केवळ खेळखंडोबा

ताप, सर्दी खोकला असलेल्या व्यक्तीला आयसोलेशन करण्याचे निर्देश आहे. परंतु पॉझिटिव्ह रुग्णाला महापालिकेचे डॉक्टर सात-सात दिवस भेटत नाही. रुग्णांच्या आरोग्यासोबत केवळ खेळखंडोबा करण्यापलिकडे काहीही झाले नाही. महापालिकेच्या रुग्णालयात, अ‍ॅम्ब्युलंन्समध्ये ऑक्सिजनची व्यवस्था नाही. अशा व्यवस्थेत रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यसाठी महापालिका जबाबदार असेल असेही ते म्हणाले.

अवश्य वाचा - राणे कुटुंब आत्महत्या प्रकरण! नातेवाईकांनी दिली ही महत्त्वाची माहिती.. गुंता अधिकच वाढला.. चार पथकांची नियुक्ती

‘शासनाला आयुक्तांनी खोटी आकडेवारी दिली`

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरातील कोविड संदर्भातील आढावा घेतला असता त्या बैठकीत आयुक्तांनी महापालिका सक्षम असल्याचे सांगितले होते. परंतु, ९६७ रुग्ण वेटींगवर आहे हे खरे आहे काय? आयुक्तांनी खोटे का सांगितले, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत आयुक्तांनी केअर सेंटरमध्ये दहा हजार रुग्णांना दाखल करण्याची व्यवथा असल्याचे सांगितले. परंतु, बेडसंख्या २,१०० च्या पुढे जात नाही. ही लबाडी नाही तर काय आहे? असा टोलाही तिवारी यांनी हाणला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top