esakal | ते तुकाराम मुंढे आहे... डोळ्यांत धूळ फेकणे कठीणच, वाचा संपूर्ण प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Tukaram Mundhe suspended nine employees

त्यांनी मनपातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रत्येक कर्मचारी कुठे आहे, त्याचे ट्रॅकिंग केले जाते. 

ते तुकाराम मुंढे आहे... डोळ्यांत धूळ फेकणे कठीणच, वाचा संपूर्ण प्रकार

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : महापालिका आयुक्त तकाराम मुंढे यांना कर्तव्यात कसूर केलेली अजिबात आवडत नाही. तरीसुद्धा काही कर्मचारी त्यांच्याही डोळ्यांत धूळ फेकण्याचे प्रयत्न करतात. ही बाब लक्षात येताच आयुक्‍त महानगरपालिकेच्या मुख्यालयात धडकले. तेथूनच कामचुकारांची झाडाझडती घेत नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने कामचुकारांमध्ये धडकी भरली आहे. 

तुकाराम मुंढे सकाळी सहा वाजताच मनपा मुख्यालयात पोहोचले. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष 24 तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना पाळीमध्ये बोलाविण्यात येते. मात्र, रात्र पाळीत असलेले चार कर्मचारी दिलेली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.

सविस्तर वाचा - जिच्यावर जीव ओवाळला तिच्याच डेक्‍यावर रिव्हॉलव्हर ठेऊन तो म्हणाला 'तुला उडवू का?'

त्यानंतर त्यांनी मनपातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रत्येक कर्मचारी कुठे आहे, त्याचे ट्रॅकिंग केले जाते. 

यामध्ये आशीनगर झोनचे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोनचे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोनचे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आकस्मिक पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी - तणनाशकाने फस्त केले भुईमूग पीक! काय झाले असे...

आयुक्तांनी केली उलटतपासणी

आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली. तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तेथेही काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत. 

संपादन - नीलेश डाखोरे 

loading image
go to top