खवल्या मांजराचे मांस खाणे आले अंगलट

मेळघाट व्याघ्रप्रकल्प परिसरातील घटना
Indian Pangolin
Indian PangolinSakal

धारणी (जि. अमरावती) - मेळघाट व्याघ्रप्रकल्पात अतिसंरक्षित कक्षेत येत असलेल्या खवल्या मांजराची शिकार करून त्याचे मांस खाल्ले. त्यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार त्यांच्या चांगलाच अंगलट आला.

सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे वनविभागाची चमू दोघांपर्यंत पोहोचली. व्याघ्रप्रकल्पाच्या सुसर्दा वनपरिक्षेत्रात ही घटना घडली. झनकलाल बाटू कास्देकर व जनकलाल मुन्शी कासदेकर अशी अटकेतील दोघांची नावे असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेळघाट प्रादेशिक सुसर्दा वनपरिक्षेत्राअंतर्गत दुर्मीळ खवल्या मांजर गावात शिरल्यानंतर काहींनी त्याची शिकार करून त्याचे मांस खाल्ले. नखे आणि खवले जपून ठेवले होते. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून वनविभागाला मिळाल्यावर वनविभागाने दोघा संशयितांना अटक केली. वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर, वनसंरक्षक सुधीर मेटकर आदींनी चौकशीअंती सोशल मीडियावरील फोटोवरून जागेचा शोध घेतला. न्यायालयाने दोघांना २७ जूनपर्यंत वनकोडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com