esakal | नदी ओलांडण्याचे धाडस जिवावर; दोन शेतकरी गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

नदी ओलांडण्याचे धाडस बेतले जिवावर; दोन शेतकरी गेले वाहून

नदी ओलांडण्याचे धाडस बेतले जिवावर; दोन शेतकरी गेले वाहून

sakal_logo
By
अनिल कांबळे

कळमेश्वर (जि. नागपूर) : गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नद्या आणि नाल्यांना पूर आला. यातच कळमेश्वर पाटणसावंगी जाणाऱ्या रस्त्यावर आणि कळमेश्वर शहराला लागूनच असलेल्या गोवरी नदीवरील रपट्यावर असलेला छोटा पूल ओलांडत असताना दोघे वाहून गेले. अण्णाजी पुरुषोत्तम निंबाळकर (वय ५२) व प्रवीण ऊर्फ गुड्डू मधूकरराव शिंदे (वय ४२) दोघेही राहणार गोवरी, तालुका कळमेश्वर असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. (Two-farmers-To-be-carried-in-the-river-water-in-Nagpur-rural)

प्राप्त माहितीनुसार, दोघेही गोवरी गावावरून शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी कळमेश्वरला आले होते. गुरुवारी सकाळपासूनच कळमेश्वरसह परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते. यातच नदीच्या पलीकडे दुचाकी ठेवून दोघेही पायी जात असताना वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून शोध कार्य सुरू करण्यात आले. परंतु, शोध कार्यात अडचणी निर्माण होत होत्या.

हेही वाचा: बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटनास्थळावर कळमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसिफ रजा शेख, नायब तहसीलदार संजय भुजाडे, तलाठी सुरज साजदकर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. वृत्त लिहिस्तोवर दोघेही आढळून आले नाही. घटनेची नोंद कळमेश्वर पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: एसटीत पुन्हा सुरू होणार टिकटिक? कंपनीचा करार संपतोय

आता तरी व्हावा पूल

कळमेश्वर पाटणसावंगी रस्त्यावर गोवरी नदीचा रप्टा म्हणून नदीवर एक छोटा पूल आहे. दरवर्षी येथे पूर येतो. अनेक वर्षांपासून या नदीवर मोठा पूल व्हावा अशी मागणी होत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा पूल अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही. त्यामुळे आज दोन शेतकरी वाहून गेले. आता तरी नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

(Two-farmers-To-be-carried-in-the-river-water-in-Nagpur-rural)

loading image