Anger of ST employees
Anger of ST employeesAnger of ST employees

हक्कासाठी मेलो तरी चालेल, पर झुकेगा नही...

उमरेड (जि. नागपूर) : उमरेड आगाराच्या (Umred Depot) एकूण २४२ सेवकांपैकी ५४ सेवकांचे निलंबन करण्यात आले आहेत. यात चालक, वाहक व यांत्रिक यांचा समावेश आहे. यावरून एसटी कर्मचाऱ्यांत (Umred Depot) कमालीचा असंतोष आहे. अनेक कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करताना हक्कासाठी ‘मेलो तरी चालेल, पर झुकेगा नही’ अशा प्रतिक्रिया दिल्या. (Anger of ST employees)

राज्यातील एसटी कर्मचारी ‘लालपरी’ला राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी चार महिन्यांपासून ठाकरे सरकारकडून मागण्या मान्य करण्यासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी लढा देत आहेत. शासनदरबारी एसटी कर्मचाऱ्यांची (Umred Depot) कैफियत दुर्लक्षित कुणीही ऐकायला तयार नसल्याने काही कर्मचाऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मात्र, राज्य सरकारला त्याचे सोयरसुतक नाही.

Anger of ST employees
नाव न घेता PM मोदींचा हल्ला; म्हणाले, माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली गेली

महाराष्टात गेल्या ११५ दिवसांपासून सर्व २५० आगारात ‘लालपरी’चे सेवक संप पाळत आहेत. यात त्यांचे १०० पेक्षा अधिक कामगार शहीद झाले. त्याच धर्तीवर उमरेड आगारात (Umred Depot) रा. प. कामगारांच्या ११० दिवसांपासून दुखवटा चालूच आहे. ‘सकाळ’ प्रतिनिधीने उमरेडच्या बसस्थानक प्रवेशद्वारावर संपावर बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली असता या कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

आगारात ५४ कामगारांना बडतर्फ करण्यात आले तर ८ कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या. १२० कामगारांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या. या सर्व कारवाया मागे घेऊन लालपरीचे शासनात विलीनीकरण करून ‘लालपरी’ रस्त्यावर आणावी अशी मागणी उमरेड आगाराचे चालक, वाहक, यांत्रीक व प्रशासकीय कामगार आऱिफ शेख, युसूफ पठाण आदी सहभागी आहेत.

Anger of ST employees
राणेनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने अपशब्दात मुख्यमंत्र्यांना खडसावले

कमी पगारात वेठबिगारीचे जीवन वाट्याला

फक्त एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे. ही मागणी घेऊन शासनदरबारी टाहो फोडणाऱ्या कामगारांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याचे या ११० दिवसात दिसून आले. आधीच कमी पगारात वेठबिगारीचे जीवन जगतोय. आम्हाला आर्थिक अडचणींना तोड देण्यासाठी, घरात चूल पेटावी यासाठी कर्ज काढलेले आहे. ९९ टक्के कर्मचारी हे कर्जबाजारी आहेत. आमच्या पगारातून त्या कर्जाचे हप्ते कापल्या जातात. परंतु, ४ महिन्यांपासून आमचा पगार नाही. उसनवारी घेऊन दिवस काढणे सुरु आहे. बाहेरगावातल कर्मचाऱ्यांचे ४ महिन्यांपासून भाड्याच्या खोलीचे भाडे थकले आहे. आतातरी शासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर ‘लालपरी’चे विलीनीकरण करावे, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.

मागच्या वर्षी ७ नोव्हेंबरपासून सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आतापर्यंत ११० दिवस पूर्ण झाले. एकूण २४२ कर्मचाऱ्यांपैकी ५४ (चालक, वाहक व यांत्रिक) कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, तरीसुद्धा उर्वरित कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. या संपामुळे ‘लालपरी’च्या प्रतिदिन २४० फेऱ्यांना पूर्णविराम लागला असून ४.५० लाख प्रतिदिवसाप्रमाणे कोट्यावधींचा फटका एकट्या उमरेड आगाराला बसला आहे. येत्या ११ मार्चला न्यायालयीन निकाल लागणार असून त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- संजय डफरे, आगारप्रमुख, उमरेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com