सावधान ! पतंजलीच्या नावाखाली काढली फेक वेबसाईट, रुग्णांची होतेय फसवणूक

'पतंजली' या नावाने एक फेक वेबसाइट तयार करून रुग्णांना त्यांच्या जवळच्या परिसरातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येईल.
Patnajali
PatnajaliEsakal
Summary

'पतंजली' या नावाने एक फेक वेबसाइट तयार करून रुग्णांना त्यांच्या जवळच्या परिसरातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येईल.

नागपूर : कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेत त्यांना लुबाडण्याचा गोरखधंदा 'फेक वेबसाइट'च्या माध्यमातून सुरू असल्याची गंभीर बाब महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची तातडीने शहानिशा करून नागरिकांची लुबाडणूक थांबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. 'पतंजली' या नावाने एक फेक वेबसाइट तयार करून रुग्णांना त्यांच्या जवळच्या परिसरातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येईल.

Patnajali
कुंभमेळ्यावरून येणारे १४ दिवस क्वॉरंटाईन; पोलिस प्रशासन गंभीर

यासाठी प्रति दिवस दोन हजार रुपये असे १५ दिवसांसाठी ३० हजार रुपये जमा करावे, अशी जाहिरात या वेबसाइटवरून करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांना ही माहिती मिळताच त्यांनी याबाबत शहानिशा करण्यासाठी तेथे असलेल्या व्हाट्सअॅपवर याबाबत माहिती मागविली. महापौरांनी त्यात त्यांची निकड सांगून आपल्या घराच्या परिसरात बेड हवा असल्याचे सांगितले. समोरून पिन कोडची विचारणा झाली. पिन कोड पाठवताच त्यांना डागा हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देता येईल, त्यासाठी ३० हजार रुपये खात्यात पाठविण्यास सांगितले.

Patnajali
विनोद शिवकुमारच्या जामिनावर आज सुनावणी

डागा हॉस्पिटल हे कोविड रुग्णालय नसल्याने ही बनवाबनवी असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या लक्षात आले. त्यांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून वेबसाइटवर संपर्क केला. रेमडेसिव्हिर सोबत बेडची मागणी नोंदविली. लगेच समोरून संबंधित व्यक्तीला फोन आला. अकाउंट नंबर पाठविण्यात आला. ९० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. हा गंभीर प्रकार असून अनेक नागरिकांची यातून फसवणूक होत असेल, ही शक्यता लक्षात घेऊन महापौरांनी तातडीने याबाबत सविस्तर माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिली. या वेबसाइटचे सत्य नेमके काय हे उघडकीस आणून नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com