esakal | राज्यपाल मोदींच्या दबावात; नकारही देत नाही आणि होकारही
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu kadu

राज्यपाल मोदींच्या दबावात; नकारही देत नाही आणि होकारही

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल मोदी-शहा यांच्या दबावात काम करीत असल्याचे दिसून येते. त्याच कारणामुळे विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.

राज्य सरकारने १२ आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठविली आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, राज्यपाल कुठलेही ठोस कारण देत नाही. त्यांच्या आशा वागण्याची आणि एकूणच भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, असेही कडू म्हणाले. निवड कायदेशीर नसेल, तर राज्यपालांनी नकार द्यावा. परंतु, ते नकारही देत नाही आणि होकारही. त्यांचे हे वागणे समजण्यापलीकडचे आहे. भाजपची पुन्हा सत्ता येईल आणि विधान परिषदेवर आपल्याच कार्यकर्त्यांना पाठवता येईल, याची कदाचित ते वाट बघत असावे, असे ते म्हणाले.

हेही वाचा: नवनीत राणा यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढील महिन्यात?

जो कुणी थोडाही भाजपच्या विरोधात बोलला त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लावला जातो. महाराष्ट्रात तर अनेक नेत्यांना संपविण्याचे षडयंत्रच भाजपने रचले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्येही आहेत, पण त्यांच्यावर अद्याप एकही चौकशी लागलेली नाही. ईडी आणि सीबीआय या संस्थांना भाजपने शस्त्र बनवले असल्याचा घणाघाती आरोपही कडू यांनी केला.

शाळांचा निर्णय दोन दिवसांत

केरळ नंतर आता महाराष्‍ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आपण शाळा सुरू करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचतो आणि नेमके तेव्हाच कोरोना डोके वर काढतो. शिक्षण महत्त्वाचे पण आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी सरकार घाई करणार नाही. दोन दिवसांत शाळा सुरू करायच्या की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असेही शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

loading image
go to top