Arun Gawli :अरुण गवळीच्या प्रकरणाचा आज निकाल

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने खुनाच्या आरोपात सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
underworld don arun gawli petition hearing today at nagpur bench
underworld don arun gawli petition hearing today at nagpur benchSakal

Nagpur News : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने खुनाच्या आरोपात सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत सूट मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. प्रकरणावरील सुनावणी ५ मार्च रोजी पूर्ण झाली असून, उद्या (ता. ५) उच्च न्यायालयाचा निकाल मिळण्याची शक्यता आहे.

याचिकेनुसार, १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयात वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. गवळीने या आधारावर शिक्षेत सूट मिळविण्यासाठी सुरुवातीला कारागृह अधीक्षकांना अर्ज सादर केला होता.

गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना २ मार्च २००७ रोजी घडली होती. या प्रकरणात न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष उद्या (ता. ५) सुनावणी होणे अपेक्षित आहे. गवळीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहत आहे.

गवळीचे वयासह आजाराचे कारण

वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. विविध शारीरिक आजार जडले आहेत. निम्मा कारावासही भोगला आहे. त्यामुळे कारागृहातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती गवळीने केली होती. कारागृह अधीक्षकांनी निर्णयात २०१५ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार गवळीला शिक्षेत सूट दिली जाऊ शकत नाही, असे कारण नमूद करून तो अर्ज १२ जानेवारी २०२३ रोजी फेटाळून लावला. त्यामुळे मागील वर्षी गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com