Friendship Day 2023 : नागपुरात युनिक पद्धतीने मैत्री दिन साजरा करणार; सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

मैत्री दिवस साजरा करण्यासाठी बाजारपेठ सजली.
Happy friendship day
Happy friendship day sakal

नागपूर - रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट समजल्या जाणाऱ्या मैत्रीच्या नात्याचं सेलिब्रेशन करण्याचा दिवस म्हणजे ''फ्रेंडशिप डे''. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी उत्साहाने हा दिवस रविवारी साजरा केला जात आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ''फ्रेंडशिप बँड'' बांधण्याची चढाओढच मित्रांममध्ये दिसून येते. म्हणून शहरातील दुकाने रंगबिरंगी फ्रेंडशिप बँड्सने सजली आहेत. वजी युनिक पद्धतीने मैत्री दिवस साजरा करण्याकडे संत्रानगरीतील तरुणांचा कल दिसून येत आहे.

बँड्सची जागा ब्रासलेट्सने घेतली

मित्रांच्या हातावर बॅंड्स बांधण्याचा ट्रेंड आता कालबाह्य झाला आहे. बॅंड्सऐवजी अधिक बजेट असणारे लोक स्मार्ट वॉचला पसंती देत आहेत. तर, बीड्स ब्रेसलेट, इनफिनिटी ब्रेसलेट, सिल्वर कडा यासारख्या वस्तू तरुणांमध्ये अधिक प्रचलित आहेत. बाजारात ५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत ब्रेसलेट उपलब्ध आहेत.

Happy friendship day
Nagpur News : नागपुरातील विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या कामाला लवकरच आरंभ - फडणवीस

युनिक पद्धतीने मैत्री दिन साजरा करणार

गिफ्ट्सचे नवे ऑप्शन्स

  • पर्सनलाईज फोटो रुबिक -३००

  • टेलिपॅथी फ्लोरा फ्रेंडशिप लॅम्प - २०००

  • वुडन जीआयएफ कॅरिकेचर - ५००

  • सिक्रेट कस्टम नेमबार - १०००

  • टेक किट ऑर्गनायजर -२०००

  • कोरीव लाकडी फ्रेम - ५००

  • कस्टमाईज बुकमार्क - ३००

  • फोटो पॉप-बॉक्स - ५००

  • सॉंग फोटो फ्रेम - ५००

Happy friendship day
Nagapur : वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर, राहुल चहर नेट गोलंदाज

सहलीला जाण्याचा बेत

मैत्री दिनाचे औचित्य साधून मित्रांशी काही वेळ घालवण्यासाठी अनेकांनी ट्रिप प्लॅन केली आहे. ''वर्षातील एक दिवस मित्रांच्या सहवासात जावा म्हणून दरवर्षी आम्ही शहराबाहेर सहलीला जातो'', असे ग्रिष्माने सांगितले. रामटेक, खिंडसी, फुटाळा, पेच प्रकल्प, कुवारा भिवसन, घोगरा महादेव शहराबाहेरील अशा अनेक पर्याय तरुणांसाठी शहराबाहेर उपलब्ध आहेत.

Happy friendship day
Nagpur News : नागपुरातील संत तुकारामनगर व गुलशननगरसह विविध भागांतील वाहनधारकांना दिलासा; ‘सकाळ’चे मानले आभार

कस्टमाइज्ड गिफ्टसला पसंती

चॉकलेट, ग्रीटिंग कार्ड्स, गुलदस्ते देण्याची परंपरा आता जुनी झाली आहे. याऐवजी तरुण आता कस्टमाइज्ड गिफ्टसकडे वळत आहेत. ई-कॉमर्स साईट्सवर मोठ्या प्रमाणात हे गिफ्ट उपलब्ध असल्यामुळे बाजारपेठांमध्ये पारंपारिक गिफ्ट्सची विक्री घटली आहे.

अनेक दिवसांपासून चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघण्याचा आमची इच्छा होती. फ्रेंडशिपडेचे औचित्य साधून अखेर अनेक दिवसांनंतर आम्ही मित्र आता चित्रपट पाहणार आहोत. त्यामुळे आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

-अथांग करोडे, विद्यार्थी,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com